चंद्रशेखर बावनकुळे, जनसंवाद सभेत मोदींच्या कामांचा गौरव
गुहागर, ता. 19 : सनातन हिंदु धर्म संपविण्याची भाषा बोलणारे आयएनडीआयएमध्ये सहभागी आहेत. याचा जाब शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोल यांना विचारावा. असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितांना केले. ते शृंगारतळीत जनसंवाद यात्रेत बोलत होते. Chandrasekhar Bawankule visit to Guhagar


शृंगारतळीतील संपर्क ते समर्थन पदयात्रा जनसंवाद सभेच्या ठिकाणी पोचल्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचे गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी संपर्क यात्रेत कोणी कोणी मोदींजींना समर्थन दिले याची माहिती दिली. कोरोना महामारीतील लसीकरण, चंद्रयान, गगनयान, 370 वे कलम, तीन तलाक, राम मंदिर, किसान सन्मान योजना, यांचा उल्लेख करत एका कमळाला मत दिल्याची ही ताकद असल्याचे सांगितले. 24 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बहुसंख्येने यावे असे आवाहन केले. Chandrasekhar Bawankule visit to Guhagar


बावनकुळे म्हणाले की, संपूर्ण देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन मिळत आहे. मोदींनी द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या आदिवासी शिक्षक महिलेला देशाचे सर्वोच्च स्थान दिले आहे. नव्या संसद भवनातील पहिल्या अधिवेशनात लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देवून महिलांचा सन्मान केला आहे. देशातील 12 बलुतेदार व अठरापगड जातींच्या सन्मानासाठी विश्र्वकर्मा योजना आणली आहे. आज नरेंद्र मोदींना जगभरातून मान्यता मिळत आहे. भारताकडे पहाण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. ही आपल्या एका मताची ताकद आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपलाच जिंकून द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. Chandrasekhar Bawankule visit to Guhagar
यावेळी व्यासपीठावर भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, रायगड लोकसभा अध्यक्ष सतिश धारप, गुहागर विधानसभा अध्यक्ष डॉ. विनय नातू, प्रदेश कार्यकर्ते अतुल काळसेकर, प्रशांत शिरगांवकर, सौ. निलम गोंधळी, गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, चिपळुणचे तालुकाध्यक्ष अजित थरवळ, खेडचे तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Chandrasekhar Bawankule visit to Guhagar