चंद्रशेखर बावनकुळे, विरोधकांच्या टिकेला जनताच उत्तर देईल
गुहागर, ता. 19 : जसजशी निवडणुक जवळ येईल तशी परिस्थिती बदलेल. महाविकास आघाडीला उमेदवारही शोधावे लागतील. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. ते गुहागर मतदारसंघात महाविजय संकल्प 2024 या उपक्रमांतगर्त संपर्क ते समर्थन अभियानासाठी शृंगारतळी येथे आले होते. Chandrasekhar Bawankule visit to Guhagar
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/10/Advt-Rajan-Dali-17-Oct-to-16-Nov-2023.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/10/Advt-Rajan-Dali-17-Oct-to-16-Nov-2023.jpg)
शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा कधीही विचार नव्हता असे सांगताना शरद पवार यांनी यशवंतरावांचा दाखला दिला. त्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, अजितदादा, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी वारंवार सांगितले आहे की, 2014, 2019 आणि 2023 मध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवारांनीच घेतला होता. त्यामुळे एखाद्या व्यक्तिमत्त्वाने या वयात किती खोटे बोलावे याचा विचार करावा. 11 पक्षांची आमची महायुती लोकसभेच्या निवडणुकीत ताकदीने उतरणार आहे. राज्यातील 45 जागांवर आमचा विजय निश्चित आहे. शरद पवार यांच्यासह आयएनडीआयए च्या सर्व उमेदवारांचा पराभव होईल. हे जनतेनेच ठरविले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात आज मी 2300 हून अधिक मतदारांना भेटलो, 5 हजार पक्षप्रवेश झाले. वडापाव विक्रेता, केळी विक्रेता, पानवाला, शेतकरी, महिला या सर्वांचे समर्थन भाजपला कसे मिळते आहे हे तुम्ही देखील आजच्या संपर्क यात्रेत आपण पाहिले असेल. जसजशी निवडणुक जवळ येईल तशी परिस्थिती बदलेल. महाविकास आघाडीला उमेदवारही शोधावे लागतील. Chandrasekhar Bawankule visit to Guhagar
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/10/add.jpg1_.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/10/add.jpg1_.jpg)
पंतप्रधान मोदी सातत्याने मुंबईत येतात. ते प्रधानमंत्र्यांऐवजी प्रचार प्रमुख झालेत अशी टिका विरोधक करत आहेत. यावर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आले त्या प्रत्येकवेळी त्यांनी भरघोस निधी दिला. हा निधी राज्याच्या विकासासाठी उपयोगी पडत आहे. त्यामुळेच जनतेने मोदीजींचे अभिनंदन केले आहे. यावर काही बोलता येत नाही म्हणून विरोधक टिका करतात. आज जगाने मोदींचे नेतृत्त्व मान्य केले आहे. 14 देशांनी त्यांचा सर्वोच्च पुरस्कार मोदीजींना दिला आहे. जगातील 78 टक्के देशांनी मोदींजींना सर्वोत्कृष्ट प्रधानमंत्री म्हटले आहे. अशा व्यक्तीवर गुहागरचे आमदार टिका करतात. याचे उत्तर गुहागरमधील जनताच ऑक्टोबर 2024 मध्ये मतपेटीतून दिल्याशिवाय रहाणार नाही. Chandrasekhar Bawankule visit to Guhagar