भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्क ते समर्थन यात्रेला प्रचंड प्रतिसाद
गुहागर, ता. 19 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्क ते समर्थन यात्रेला श्रृंगारतळीतील व्यापारी, छोटे दुकानदार, ग्रामस्थ यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ते जातील त्या दुकानात नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान पाहिजेत असा गजर ऐकू येत होता. पदयात्रेनंतर झालेल्या जनसंवाद सभेतही मोदी, जय श्रीरामचा जयघोष सुरु होता. Chandrasekhar Bawankule visit to Guhagar
गुहागरमधील दुर्गादेवीचे दर्शन घेवून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शृंगारतळीत दाखल झाले. निळकंठेश्र्वर नवरात्री उत्सवातील देवीचे दर्शन घेवून त्यांनी संपर्क ते समर्थन यात्रेला सुरवात केली. रस्त्याच्या आजुबाजुला असलेल्या प्रत्येक दुकानामध्ये शिरुन बावनकुळे तेथील सर्वांना पुढचा पंतप्रधान कोण पाहिजे विचारत होते. मोदीच का पंतप्रधान पाहिजेत असेही विचारत होते. यामध्ये अनेकांनी केंद्र सरकारच्या योजनांचा दाखल देत, अयोध्येतील श्रीराम मंदिर, काश्मिरमधील 370 कलम हटविल्याबद्दल, महिलांना आरक्षण दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा प्रकट केली. Chandrasekhar Bawankule visit to Guhagar
पालपेणे फाटा ते शृंगारतळी बाजारपेठेतील जनसंवाद सभेचे ठिकाणादरम्यान बावनकुळे यांनी रस्त्यावर उभे असलेले ग्रामस्थ, व्यापारी, दुकानदार, वडापाव विक्रेते, पानवाला, केळीवाला, रिक्षाचालक, भेळ विक्रेते, डॉक्टर सर्वांशी संवाद साधला. पदयात्रेदरम्यान शृगारतळी बाजारपेठेतील नवरात्री उत्सव मंडपात जावून दुर्गादेवीचे दर्शन घेतले. तिथे मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या पदयात्रेमध्ये गुहागर मतदारसंघातील सुमारे 3 हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. Chandrasekhar Bawankule visit to Guhagar