संदेश कदम,आबलोली
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयातील विद्यार्थांनी शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. इ.८ वी याच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. Chandrakant Bait School Scholarship Exam Success


गुहागर तालुक्यातून १४ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. या १४ पैकी ५ विद्यार्थी हे आबलोली विद्यालयाचे आहेत. यामध्ये कु. तन्वी अनिल मोरे हिने गुहागर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून कु. श्रेयस सतीश विचारे याने गुहागर तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर कु. किमया दिनेश नेटके, कु.वैष्णवी विकास मेस्त्री, कु.आदित्य सखाराम मते हे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. Chandrakant Bait School Scholarship Exam Success


तसेच इ.८ वी साठी होणाऱ्या एन. एम. एम. एस परीक्षेमध्ये सुद्धा चंद्रकांत बाईत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आबलोलीच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये कु. श्रावणी महेश साळवी, कु. आदित्य सखाराम मते या दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६०,०००/- (साठ हजार रुपये) स्कॉलरशिप मिळणार आहे. सदर परीक्षेसाठी प्रशालेतील शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री.डी.डी. गिरी सर, लोकशिक्षण मंडळ आबलौलीचे कार्याध्यक्ष श्री. आबासाहेब बाईत, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .सचिन शेठ बाईत यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. Chandrakant Bait School Scholarship Exam Success