• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्मृतीशेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय पुरस्कार घोषित

by Guhagar News
May 17, 2025
in Guhagar
69 0
0
Chameli Bhaurao Award Announced
135
SHARES
385
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जळगाव, ता. 17 : स्मृती शेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगावच्या वतीने “स्मृती शेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय काव्य आणि कादंबरी” पुरस्कारासाठी सन २०२४ साठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. राज्यभरातून या पुरस्कारासाठी उत्तम प्रतिसादही लाभला. ४२ कवितासंग्रह आणि १० कादंबऱ्या प्राप्त झाल्या होत्या. Chameli Bhaurao Award Announced

पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. उत्तम आणि नाविन्यपूर्ण दर्जेदार कलाकृतींची नि:पक्षपणे निवड करून कवी आणि कादंबरीकार यांचा सन्मान व्हावा आणि मराठी साहित्य क्षेत्रात अभिरुची संपन्न साहित्य कलाकृतीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी हे पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षी २०२४ साठी कवितेचा राज्यस्तरीय पुरस्कार वाशिमचे कवी महेंद्र ताजणे यांच्या “खूप काही आणखी” या कॉपर कॉईन पब्लिशिंग प्रा. लि. दिल्ली प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहास आणि कादंबरीचा राज्यस्तरीय पुरस्कार डॉ. बाळासाहेब लबडे, गुहागर, जि. रत्नागिरी  यांच्या “चिंबोरेयुद्ध “या  अथर्व पब्लिकेशन्स जळगाव यांनी प्रकाशित केलेल्या  कादंबरीसाठी घोषित करण्यात आलेला आहे. Chameli Bhaurao Award Announced

या पुरस्काराचे स्वरूप  दोन्ही कलाकृतींना रू. पाच हजार, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे असून लेखकाच्या गावी त्या जिल्ह्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांच्या हस्ते कौटुंबिक स्वरूपात कवी/कादंबरीकार यांचे निवासस्थानी करण्यात येणार आहे. असाच सन्मान गेल्या वर्षी झाल्याने कवी/कादंबरीकार यांचे कुटुंबीय आनंदीत झालेले होते. अशा पुरस्कार प्रदानाचे स्वागतही साहित्यक्षेत्रात झाले होते. Chameli Bhaurao Award Announced

या पुरस्काराचे संयोजक शशिकांत हिंगोणेकर आणि उषा हिंगोणेकर यांनी आज निकाल घोषित करून पुरस्कार प्राप्तकर्त्यांना सुखद धक्काही दिला. कवी महेंद्र ताजणे आणि कादंबरीकार डॉ. प्रा. बाळासाहेब लबडे यांचे  नव्या लेखनासाठी अभिनंदन आणि शुभेच्छापर पत्रही संयोजकांनी पाठवले आहे. Chameli Bhaurao Award Announced

Tags: Chameli Bhaurao Award AnnouncedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.