पीएमश्री वेळणेश्वर नं १ प्रशालेचा विद्यार्थी
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पीएमश्री वेळणेश्वर नं १ प्रशालेचा इयत्ता ५ वी तील विद्यार्थी चैतन्य रमेश गोणबरे याची नुकतीच भारत सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. Chaitanya Gonbare selected for Navodaya Vidyalaya


या यशासाठी चैतन्य याला प्रशालेचे मुख्याध्यापक सतीश नलावडे, पदवीधर शिक्षिका शैलजा साळे, विषय शिक्षक मंदार कानडे, वर्गशिक्षक उमेश नाटेकर, उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर, उपशिक्षिका सुलक्षणा करडे, उपशिक्षिका भारती गोवेकर, वर्गशिक्षक तेजस्विनी जगताप, प्रियांका पवार, अंजूम शेख आदी शिक्षकांचे व आई रिया वडील रमेश यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. Chaitanya Gonbare selected for Navodaya Vidyalaya


या यशाबद्दल चैतन्य यांचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे, शिक्षण विस्तार अधिकारी अविनाश शेंबेकर, शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रीय प्रमुख नामदेव लोहकरे, केशव शिरसागर, माजी जि.प सदस्या नेत्राताई ठाकुर, वेळणेश्वर वाडदई ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच नितीन पोळेकर, उपसरपंच अमोल जामसुतकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग, उपाध्यक्ष वैभव ठाकूर व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, माता पालक संघ शिक्षक पालक संघ सर्व विद्यार्थी पालक व वेळणेश्वर ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Chaitanya Gonbare selected for Navodaya Vidyalaya