• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बाया कर्वे कौशल्य विकास केंद्रात प्रमाणपत्र वितरण

by Guhagar News
December 27, 2022
in Ratnagiri
112 1
0
Certificate Distribution at Baya Karve Skill Center
220
SHARES
628
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कर्ज योजनांचा लाभ घेऊन महिलांनी व्यावसायिक बनावे – प्रिती पटेल

रत्नागिरी, ता. 27 : ब्युटीपार्लर असो वा फूड प्रोसेसिंग, फॅशन डिझायनिंग व्यवसायासाठी कर्जपुरवठा केला जातो. त्यातून महिलांनी व्यावसायिक बनावे, असे आवाहन शामराव पेजे आर्थिक महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापिका प्रीती पटेल यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आली. Certificate Distribution at Baya Karve Skill Center

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे कौशल्य विकास केंद्रात विविध अभ्यासक्रमांच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी शिरगाव प्रकल्पाच्या स्थानिय समितीचे सदस्य प्रसन्न दामले, रत्नागिरी प्रकल्प समन्वयक स्वप्निल  सावंत आणि बीसीए कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा कोतवडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. Certificate Distribution at Baya Karve Skill Center

Certificate Distribution at Baya Karve Skill Center

बाया कर्वे कौशल्य विकास केंद्र कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे बंद ठेवण्यात आले होते. परंतु आता सर्व निर्बंध उठल्यामुळे जून-जुलै मध्ये ब्युटीपार्लर, फॅशन डिझायनिंग व फूड मेकिंग कोर्स सुरू केले आहेत. याबरोबरच मागणीनुसार नवनवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून याला कॉलेजच्या मुली, महिला, गृहिणींचा प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त महिलांनी या कोर्सेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वप्निल सावंत यांनी केले. Certificate Distribution at Baya Karve Skill Center

यावेळी महर्षी कर्वे संस्थेबद्दलची माहिती स्नेहा कोतवडेकर यांनी दिली. तसेच सर्टिफिकेट कोर्स केल्यानंतर ऍडव्हान्स कोर्स करण्याकरिता आपल्या येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत सुविधा आहे. तसेच पुण्यात ही संस्थेचे विविध डिप्लोमा डिग्री कोर्स असतात तिथे आपण माहिती घेण्यासाठी जाऊ आणि व्यवसाय वाढीसाठी काम करू, असे प्रसन्न दामले यांनी सांगितले. Certificate Distribution at Baya Karve Skill Center

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फॅशन डिझायनिंग कोर्सच्या इस्न्ट्रक्टर सौ. वृषाली नाचणकर यांनी केले तर संचिता पेठे व अंतरा फडणीस यांनी विद्यार्थिनींनी आपले अनुभव  मनोगतातून व्यक्त केले. Certificate Distribution at Baya Karve Skill Center

Tags: Certificate Distribution at Baya Karve Skill CenterGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share88SendTweet55
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.