बोटी व जाळ्यांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत वाढवली
मुंबई, ता. 04 : नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमारांना बोटी व जाळ्यांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत वाढविण्याचा केंद्र सरकारचा दिलासा. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (NDRF) सुधारित निकषांमध्ये मत्स्यव्यवसायाचा समावेश असून २०२६ ते २०३१ या कालावधीत लागू राहणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमार, लहान व सीमांत शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. Central government relief for disaster-affected fishermen
मत्स्यव्यवसायासाठी सुधारित आर्थिक मदतीचे निकष
अंशतः नुकसान झालेल्या मासेमारी बोटींच्या दुरुस्तीसाठी : प्रति बोट ८,००० रुपये आर्थिक मदत. अंशतः नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी : प्रति जाळे ४,००० रुपये मदत. पूर्णतः नुकसान झालेल्या मासेमारी बोटींच्या पुनर्स्थापनेसाठी : प्रति बोट १९,००० रुपये मदत. पूर्णतः नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांच्या पुनर्स्थापनेसाठी : प्रति जाळे ५,१०० रुपये मदत. मत्स्यबीज फार्मसाठी : लहान व सीमांत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १३,००० रुपये इनपुट सबसिडी.या मदतीसाठी काही पात्रता अटीही निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित नुकसानीसाठी अन्य शासकीय योजनेंतर्गत मदत घेतलेली असल्यास त्याच नुकसानीसाठी पुन्हा मदत मिळणार नाही. तसेच विमा संरक्षणातून मिळालेली रक्कम असल्यास ती आर्थिक मदतीत समायोजित केली जाणार आहे. Central government relief for disaster-affected fishermen
