• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पितळे कुटुंबीयांचा शतक महोत्सवी गणेशोत्सव साजरा

by Ganesh Dhanawade
September 16, 2022
in Guhagar
17 0
1
Centenary Ganeshotsav of Pitale family
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.16 : तालुक्यातील आरे येथील पितळे यांच्या घरी कुटुंबीयांचा शतक महोत्सवी सहा दिवसांचा गौरी – गणपती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. हा शतक महोत्सवी सोहळा संपूर्ण पितळे कुटुंबातील सर्व पिढ्यांनी एकत्रित येऊन साजरा केला. Centenary Ganeshotsav of Pitale family

आरे येथील कै. द्वारकानाथ लक्ष्मण पितळे, कै. वामन गणेश पितळे व कै. सदाशिव गणेश पितळे ह्या तीन भावंडांनी सन 1922 साली सुरु केलेल्या घरच्या गणेश उत्सवला यावर्षी 100 वर्षे पूर्ण झाले. यावर्षीचा शतक महोत्सवी सोहळा हा चौथ्या पिढीने मोठ्या आनंदाने साजरा केला. आजची तरुण पिढी दिगंबर पितळे, संजय पितळे, राजेश पितळे, अजय पितळे, विजय पितळे, वैभव पितळे ह्यानी या सोहळ्यासाठी मागील वर्षापासून नियोजन केले होते. Centenary Ganeshotsav of Pitale family

Centenary Ganeshotsav of Pitale family

2022 मध्ये घरात येणाऱ्या पालखीने त्याचा श्री गणेशा रचला. आणि त्याच दिवशी ठरवले गेले की यावर्षी काहीतरी आगळे वेगळे करून दर्शनाला येणाऱ्या भाविकांना नातेवाईक, आप्त आप्तेष्टांना व आरेगावच्या रहिवाशांना श्रीचे दर्शन होईल. त्याप्रमाणे गजाननाला बसायला चांदीचा चौरंग, पाठीमागे दोन आकर्षक चांदीचे खांब व त्या खांबांवर किर्तीमुख असलेली कलाकुसरीने केलेली प्रभावळ (कमान), गणपतीच्या छतावर आकर्षक पद्धतीचे फॉल सिलींग व पाठीमागची भिंत stracture पद्धतीने लाल मरुन रंगात रंगवून त्यावर सोनेरी रंगाची वेलबुट्टी खुलून दिसत होती. सर्वात महत्वाचे म्हणजे गणेशमूर्ती बनवणारे मुर्तीकार सिद्धेश माने ह्यांनी पितळे कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे हवी तशी महीरपात खुलून दिसेल अशी मुर्ती बनवून दिली होती. चौरंगावर स्थानापन्न झालेल्या श्रीगणेशाचे लोभसवाणे रूप हे नजर हटवू न देणारे मुर्तीकाराला दाद देऊन गेले. ह्या सोहळ्यासाठी समस्त पितळे कुटुंबीयांसह, नातेवाईक, माहेरवाशीणी यांना अगत्याचे, आग्रहाचे आमंत्रण दिले होते. प्रत्येकजण आपापल्यापरीने उपस्थित राहीले. Centenary Ganeshotsav of Pitale family

Centenary Ganeshotsav of Pitale family

गणेश चतुर्थीच्या पहील्या दिवशी गणरायाचे आगमन गणेश मुर्तीवर गुलाब पाकळ्यांच्या वर्षांवात वाजत गाजत धूमधडाक्यात झाले. आरे गावचे पौरोहीत शशिकांत महाजन यांनी गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पितळे घरात, कुटूबीयात भावचैतन्य निर्माण केले.101 मोदकांचा (उकडीच्या) बाप्पाला नैवेद्य अर्पण करण्यात आले. सायंकाळी राजेश पितळे ह्यांच्या शब्द सुमनाने “श्री गणेश एकविशंती नाममात्यम् ” 11वेळा सहकुटुंब सहपरीवाराने स्तोत्र मंचारण करून गणेशाप्रती आराधना करून भाविकपणाने हा कार्यक्रम पार पडला. Centenary Ganeshotsav of Pitale family

दुसऱ्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर ओंकार प्रणवच्या दिर्घ श्वासाने पितळे घर दुमदुमले. तिसऱ्या दिवशी सायंकाळी कविराज वैभव पितळे यांनी आलेल्या पाहुण्याच्या जुन्या आठवणीवर खूमार शैलीत टिकाटिपणी करून पोटधरून खळखुळून हसवले. रात्री दिड तासाच्या आरतीने पितळे घर दुमदुमले. चौथ्या दिवशी गौराईचे आगमन झाले. यासाठी सकाळपासून जोरदार तयारीला सुरु होती. गौरीसाठी लागणारी फुले, वेणी, तेरडे, काकडी, भेंडीची फुले, साजशृंगार वगैरेनी पितळे कुटुंबातील महीलांचा उत्साह शिगेला पोहचला होता. त्यात गरबा नृत्य, फुगडया, झिम्मा खेळून रंगत आणली. नंतर चलग सई, चल चल बाई गौराई आल्यात सोन्याच्या पायीच्या… गाण्यावर नाचत गाजत, फटाक्यांच्या धूमधडाक्यात मंदिरातून घरापर्यंत मिरवणूक काढून फुलांच्या वर्षांवात गौराईचे घराच्या प्रवेश द्वारावर येताच प्रथम औक्षण करून स्वागत केले व घरामध्ये उमटलेल्या हळद-पिंजरीच्या पाऊल खुणावर पाऊल टाकत टाळ मृदूंगाच्या जयघोषात गौराईचे आगमन गणपती शेजारी मांडलेल्या खुर्चीवर विराजमान झाल्या नंतर घरातील महिलांनी तिला सजविले. Centenary Ganeshotsav of Pitale family

एक विलोभनीय गणपतीची माता पार्वती (गौराई) हिचे रुप पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. त्यातच आरेगावातील महिला मंडळानी तिच्या समोर नृत्याचा अविष्कार दाखवत तिची मनोभावे प्रार्थना करून मानवंदना दिली. नंतर पुरुष मंडळींनी ही गणेश वंदना/बाल्या डांस केला. पाचव्या दिवशी जेष्ठ गौरी पुजनाच्या दिवसाचा उत्साह शिगेला पोहचला होता. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गौरी-गणपतीची सजावट बघून पितळे कुटुंबीयांचे खूप कौतुक केले. त्यांच्या मागील पिढीतील आठवणींना उजाळा देऊन असेच उत्साहाचे, आनंदाचे वातावरण कायम ठेवून असाच सलोखा वाढवा, एकजूट ठेवा असा संदेश त्यांना दिला. तसेच हा शतक महोत्सवी सोहळा पाहण्यासाठी मुंबईहून त्यांचे मित्रपरिवार यांनी धावती भेट दिली. सहाव्या दिवशी पौरोहीत शशिकांत महाजन ह्यांनी विसर्जनापूर्वीची विधीवीत पूजा करवून “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात आपल्या लाडक्या गणरायाला व गौराईला समस्त पितळे कुटुंबीयांना निरोप दिला. अशा प्रकारे समस्त पितळे कुटुंबीयांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेला गणरायाचा हा सोहळा आजही तितक्याच ताकदीने आणि आनंदाने साजरा केला. शतक महोत्सवी हा सोहळा संपूर्ण पितळे कुटुंबीयांना एका धाग्यात गुंफून ठेवणारा ठरला आहे. Centenary Ganeshotsav of Pitale family

Tags: Centenary Ganeshotsav of Pitale familyGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.