श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळ, गुहागर आयोजित
गुहागर, ता. 08 : सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या खालचापाट येथील श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळ आयोजित सोहळ्याला रविवारी पालखी मिरवणुकीने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात आणि पुरुष – महिलांनी बांधलेले फेटे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. Celebrations of Sri Varati Devi

श्री वराती देवीवर सर्व भाविकांची अपार श्रद्धा आहे. नवसाला पावणारी देवी म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. दरवर्षी मे महिन्यात देवीच्या मंदिराचा वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. यानिमित्त रविवारी ७ मे रोजी सकाळी देवीची षडोशोपचार विधिवत पूजा, सायं. ५.३० वाजता गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी येथील महिला व पुरुषांनी ढोल वादनाचा आनंद लुटला. सोमवार ८ रोजी सकाळी देवीची षडोशोपचार विधिवत पूजा, श्री सत्यनारायणाची महापूजा, सायं. ४ वा. कलावती आईंचे भजन, सायं. ५ वा. पासून सिंगळबारी भजन, ७ वा. देवीची महाआरती, सायं. ७.३० वा. स्थानिक भजने, रात्री ९.३० वा. डोंबिवली येथील श्री गावदेवी प्रासादिक भजन मंडळ व परेल मुंबई येथील श्री विमलेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ यांचा डबलबारी भजनांचा जंगी सामना होणार आहे. Celebrations of Sri Varati Devi

मंगळवार ९ रोजी सकाळी देवीची षडोशोपचार विधिवत पूजा, सायं. ४ ते ६ वा. हळदीकुंकू, ७ वा. देवीची महाआरती, रात्री ९.३० वा. महिला व लहान मुलांसाठी फनी गेम, १० रोजी सकाळी देवीची षडोशोपचार विधिवत पूजा, सायं. ७ वा. देवीची महाआरती, रात्री ९.३० वा. ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा, गुरुवार दि. ११ रोजी सकाळी देवीची षडोशोपचार विधिवत पूजा, कुंकूमार्जन सोहळा, सायं. ७ वा. देवीची महाआरती, रात्री ७.३० ते रात्री १० वा. देवीचा महाप्रसाद, रात्री १० वा. वरवेली खालचीवाडी येथील नवतरुण नमन मंडळाचा बहुरंगी नमन सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. Celebrations of Sri Varati Devi
