रत्नागिरी, ता. 04 : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मुकबधिर विद्यालयाचा (Keshav Parashuram Abhyankar Deaf School)आज ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी जयेंद्र जाधव व समाज कल्याण अधिकारी दीपक आंबवलेकर उपस्थित होते. Celebrating the anniversary of Abhyankar Deaf School

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश घवाळी यांनी केले. मुख्याध्यापक गजानन रजपूत यांनी संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रासाठी पुस्तके, वह्या, गणवेश, खेळणी व इत्तर साहित्याचे वाटप करण्यात आले. इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण आकाश भोसले, सुजल बेनेरे, शुभ्रा देवळेकर, श्रुती गावडे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शासकीय रेखाकला परीक्षेत कशीश नदाफ, ऋतुजा सातोपे, इरझान शिरगांवकर, श्रुती बोरकर, हबीबा शेख, कोमल शिनगारे, सोहम आलिम, हसीब मालगुंडकर या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ऋतुजा सातोपे हिने अभिसार फाऊंडेशन ऑल इंडियातर्फे फॅशन डिझाईनचा 45 दिवसांचा कोर्स पूर्ण केला. तिचाही सत्कार केला. चालू वर्षी नवीन वैवाहिक दांपत्याचे स्वागत केले. या सर्वांसाठी विशिष्ट देणगीदारांनी देणगी दिली होती. Celebrating the anniversary of Abhyankar Deaf School

प्रमुख पाहुणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जयेंद्र जाधव यांनी सांगितले की, अपंग हा कमीपणा नसून सर्वांसोबत जगणे आवश्यक आहे. त्यांनी शाळेची भरपूर प्रशंसा केली. त्यांनी जिल्हा परिषदेमधील काही योजनांची माहिती पालकांनी समजावून सांगितली. ते पालकांना म्हणाले की, आपल्या दिव्यांग मुलांसाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्याकडे काही निधी असतो. आपण तो निधी आपल्या मुलांसाठी उपयुक्त कसा करता येईल, यांचा विचार करावा. Celebrating the anniversary of Abhyankar Deaf School
संस्थेच्या कार्याध्यक्ष अॅड. सौ. भावे यांनी सांगितले की, आपल्या मुलांना हक्कांची मदत करण्यासाठी आपला हक्काचा माणूस त्या जागेवर आहे. या सर्वांचा फायदा आपल्या मुलांना खुप मोठ्या प्रमाणावर होईल. श्री. कसबे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापक राजाराम पानगले, पालक प्रतिनिधी सौ. सुर्वे, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी व देणगीदार, विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. Celebrating the anniversary of Abhyankar Deaf School
