संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील कुडली नं.३ माटलवाडी शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साने गुरुजी विद्यार्थी बचत बँकेचे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात उदघाटन उत्साहात संपन्न झाले. या बचत बँकेची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक संदेश सावंत यांनी सर्व लोकांसमोर मांडली. श्री. खारतोडे, श्री.पाडवी यांनी या बचत बँकेच्या कागदपत्रांचे नियोजन केले. Student Savings Bank at Kudli School
विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी व बँकेचे सर्व व्यवहार विद्यार्थ्यांना समजावे, बँकेत पावती भरून रक्कम काढणे, बँकेत पावती भरून रक्कम भरणे, पासबुकामध्ये नोंद करणे या गोष्टी या बँकेमध्ये केल्या जाणार आहेत. शाळेतील विद्यार्थी बँक मॅनेजर, कॅशियर व इतर कर्मचारी राहणार आहेत. भविष्यामध्ये येणाऱ्या बँकेमधील अडचणी लहान वयातच मुलांना सोडवता याव्या. हा उद्देश समोर ठेऊन या बचत बँकेची निर्मिती करण्यात आली आहे. Student Savings Bank at Kudli School
या बँकेच्या उद्घाटनसाठी श्री. पांडुरंग पिलाजी थोरसे, श्री. शांताराम थोरसे, श्री. शिवराम थोरसे, श्री.यशवंत माटल, श्री राजेश वनये, श्री.मुकेश थोरसे, श्री. रवींद्र ठोंब,रे श्री. संजय ठोंबरे, श्री. विजय घडशी, श्री दिनेश माटल, सौ. संजीवनी थोरसे, सौ. मनीषा गावनंग सौ.आवनी माटल, सौ.अर्चना जोशी, सौ. उर्मिला ठोंबरे तसेच सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे उपशिक्षक खारतोडे सर यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक संदेश सावंत यांनी मानले. Student Savings Bank at Kudli School