संदेश कदम – आबलोली
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा काजुर्ली नं. २ मानवाडी येथे आजी – आजोबा दिवस मान्यवरांचे उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे पाय धुऊन पूसून त्यांचे औक्षण केले. Celebrating Grandparents Day at Kajurli School

सद्याच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंब संस्था मोडकळीस आल्याचे किंवा विस्कळीत झाल्याचे दिसून येते. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांना आजी आजोबा परके झाल्यासारखे वाटते. मोबाईल मुळे तर माणसे एकमेंशी संवाद साधतच नाही केवळ यांत्रिक चर्चा होतात. पण भविष्यात कुटुंब संस्था मजबूत होण्यासाठी आजी आजोबा यांचे महत्त्व मुलांना समजावून सांगणे काळाची गरज आहे. आणि म्हणूनच की काय शासनाने शाळेत आजी – आजोबा दिवस साजरा करण्याबाबत परिपत्रक काढले. Celebrating Grandparents Day at Kajurli School

सर्व विद्यार्थी आपल्या आजी – आजोबा यांना घेऊन शाळेत आले होते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आजी – आजोबांची ओळख करून दिली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या आजी – आजोबांची माहिती सांगून कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे पाय धुऊन पूसून त्यांचे औक्षण केले. या वेळी अनेक आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी आले, गळा दाटून आला त्यांनी आपल्या नातवंडांना मिठी मारलेली पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. या वेळी नारायण मोहिते यांनी आजी – आजोबा यांचे बद्दल मौल्यवान माहिती दिली. Celebrating Grandparents Day at Kajurli School

यावेळी काजुर्लीच्या सरपंच श्रीमती.रुक्मिणी सुवरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.सायली रेवाळे, उपाध्यक्ष सौ.अंजली कुवारे, सर्व शिक्षक, सर्व समित्यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन मुख्याध्यापक श्री.दशरथ साळवी, शिक्षक श्री.संदेश सावंत, स्वयंसेविका सौ.श्रावणी पागडे, सौ.आम्रपाली जाधव, तसेच विद्यार्थ्यांनी आप आपली जबाबदारी पार पाडली. शेवटी मुख्याध्यापक श्री.दशरथ साळवी यांनी सर्वांचे आभार मानले. Celebrating Grandparents Day at Kajurli School