• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

२५ वर्षानंतर दांपत्य चढले पुन्हा बोहल्यावर

by Manoj Bavdhankar
January 3, 2023
in Guhagar
518 5
0
Celebrating 25th wedding anniversary
1k
SHARES
2.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तवसाळ येथे लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त रंगला अनोखा सोहळा

निलेश सुर्वे, तवसाळ
गुहागर, ता. 03 : सरत्या 2022 सालाला निरोप देताना 31 डिसेंबर 2022 रोजी  २५ वर्षानंतर देवीका आणि दिनेश दिवेकर या दांपत्याने आपली रेशीमगाठ पुन्हा एकदा घट्ट केली. तवसाळ गावच्या निसर्गरम्य वातावरणात या अनोख्या लग्न सोहळ्याची रंगत आणखीनच वाढली. Celebrating 25th wedding anniversary

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

चिपळूण तालुक्यातील भिले गावातील मुळचे व आता सि वुडस्, नवी मुंबई येथे वास्तव्यास असणारे दिनेश लहू दिवेकर आणि सौ देविका दिनेश दिवेकर यांनी आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा केला.  गुहागर तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणुन विकसित होत  असलेल्या तवसाळ या निसर्गरम्य ठिकाणी आपली आत्या सौ. नंदिनी नंदकुमार मिशाळ यांच्या निवासस्थानी पुन्हा बोहल्यावर चढत मोठ्या उत्साहात, दिमाखदार पद्धतीने साजरा केला. Celebrating 25th wedding anniversary

Celebrating 25th wedding anniversary

२५ वर्षांपूर्वी १९९७ साली मुळचे चिपळूण तालुक्यातील दाभोळ खाडी मधील भिले गावचे रहिवासी असणारे आणि मुंबई मजगाव डॉक मध्ये नोकरी करणारे लहू विठोबा दिवेकर यांचे  मंत्रालयात होम डिपार्टमेंट मध्ये नोकरी करणारे ज्येष्ठ चिरंजीव दिनेश यांचा विवाह दाभोळ खाडी परिसरातीलच मात्र खेड तालुक्यातील कोतोली गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ शांताराम काशीराम जाधव यांची कन्या जयश्री हिच्या बरोबर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. जाधव आणि दिवेकर हे दाभोळखाडीतील भोई समाजातील घरंदाज आणि संस्कारी घराणे यामुळे दिनेश  आणि देविका यांचा संसारही या संस्कारांमुळे बहरत गेला. या संसार वेलीला आलेली दोन संस्कारी फुले म्हणजेच दिनेश दिवेकर यांचा ज्येष्ठ चिरंजीव राज मर्चंट नेव्हीचे शिक्षण घेत आहे. तर कनिष्ठ कन्या दक्षता हिनेही सायन्समधुन पदवी प्राप्त केली आहे. संसाराचा गाडा ओढत असताना आणि मुलांचे शिक्षण होत असताना या सुखी संसाराची २५ वर्ष कधी पुर्ण झाली हे दिवेकर कुटुंबाला कळलच नाही. Celebrating 25th wedding anniversary

सोशल मीडियाच्या युगात लग्नाचे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होत असताना दिनेश दिवेकर यांची आई, भावंडे आणि मुले यांनी दिनेश आणि देविका यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करायचा ठरवला. आणि त्याला साथ दिली ती त्यांची आत्या सौ नंदिनी नंदकुमार मिशाळ यांनी, आणि मग ठरलं, आत्याच्या गावी म्हणजे तवसाळ गावी दिनेश आणि देविका या दोघांनाही पुन्हा त्याच रीती-रीवाजाप्रमाणे लग्नाच्या बोहल्यावर चढवायचं आणि त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस करायचा. या नियोजनाप्रमाणे तवसाळमधील नंदकुमार मिशाळ यांचं घर गजबजुनच गेलं होत. Celebrating 25th wedding anniversary

Celebrating 25th wedding anniversary

३१ डिसेंबर २०२२ रोजी ज्याप्रमाणे एखाद्या नव्या लग्नाची लगबग असते त्याप्रमाणेच मिशाळांच्या घरी सनई चौघडा वाजु लागला. नंदिनी वहिनींच्या आग्रहामुळे  तवसाळ गावातील शेजारीपाजारी महिला – पुरुष सुद्धा मोठ्या आनंदाने या सोहळ्या सहभागी झाले. देविका आणि दिनेश यांना २५ वर्षानंतर पुन्हा एकदा हळद लागली. हळद लागल्यानंतर  हळद लागलेले नवरा नवरी स्थानिक मंदिरात जाऊन आले. आणि संध्याकाळी रंगला तो पुनश्च विवाहाचा कार्यक्रम. २५ वर्षानंतर सुद्धा नवरा नवरीचा तोच नटखटपणा, लाजाळुपणा,  करवल्यांची धमाल, व-हाड्यांची मस्ती, मंगलाष्टकांचे मंगल, मंजुळ सुर आणि पुन्हा एकदा शुभमंगल सावधान चा जयघोष. Celebrating 25th wedding anniversary

आई-वडिलांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करत असताना आई-वडिलांना बोहल्यावर चढवुन, आंतरपाट धरून, मंगलाष्टका म्हणुन अक्षता त्यांच्या डोक्यावर टाकताना मुलगा राज आणि मुलगी दक्षता यांची लगबग तर पाहण्यासारखीच होती. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ठरवुन लग्न होणे ते टिकवणे, बहरनणे, पुर्णत्वास जाणे हि तारेवरची कसरत असतानाच दिनेश आणि देविका यांनी २५ वर्ष आदर्शवत चालवलेला संसार हा कौतुकास्पदच आहे. अनोख्या पद्धतीने लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना  सुचलेली ही कल्पना, त्यांनी २५ वर्षांपूर्वी जसा प्रतिसाद दिला तसा २५ वर्षानंतर सुद्धा दिलेला प्रतिसाद हा जमलेल्या उपस्थितीवरून समजत होता. या अनोख्या लग्न सोहळ्याला या २५ वर्षांपूर्वीच्या नवरा नवरीचा अनोळखीपणा असुनही  तवसाळ गावातील शेजारी मंडळींनी दिलेली भक्कम साथ आणि विकसनशीत पर्यटन स्थळ म्हणून ओळख निर्माण होणाऱ्या तवसाळ गावात हा रंगलेला अनोखा लग्न सोहळा परिसरात आकर्षणाचा विषय झाला आहे. Celebrating 25th wedding anniversary

या लग्न सोहळ्यासाठी दिनेश दिवेकर यांच्या आई शुभांगी दिवेकर, बहीण तेजश्री भालेकर, सुरेश भालेकर, सुदाम दिवेकर, भुषण दिवेकर, दीपक दिवेकर, रेशमा दिवेकर, निकिता दिवेकर, तेजश्री भालेकर, दीपक मिशाळ, नैना मिशाळ, दिपाली मिशाळ, देवेंद्र पडवळ, चैत्राली पडवळ, किसन पड्याळ, अशोक पड्याळ, अनंत पड्याळ, राजश्री गंधेरे, प्रतिभा गंधेरे, माया पड्याळ, या त्यांच्या संबंधित नातेवाईकांबरोबरच  कल्पवृक्ष पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष निलेश सुर्वे, ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रियांका सुर्वे, प्राजक्ता सुर्वे, संगीता सुर्वे, प्रीती गडदे, स्वामिनी सुर्वे आदींसह तवसाळ गावातील बहुसंख्या मान्यवर मंडळी उपस्थित होती. पर्यटनदृष्ट्या विकसित होत असणाऱ्या तवसाळ गावामध्ये ३१ डिसेंबर २०२२ रोजी लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुनश्च रंगलेला विवाह सोहळा सर्वांना प्रेरित व आकर्षित करणारा होता. Celebrating 25th wedding anniversary

Tags: Celebrating 25th wedding anniversaryGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share407SendTweet254
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.