कृषी प्रगत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचणे हीच श्रद्धांजली – प्रतिभा वराळे
गुहागर, ता. 02 : कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान अशा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे. शेतीचा विकास होणे, हीच खरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना श्रद्धांजली ठरेल, असा विश्वास गुहागरच्या (Guhagar) तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी गिमवी येथील कृषी दिनानिमित्त व्यक्त केला. हा कार्यक्रम 1 जुलै रोजी गिमवी येथील प्रगतीशिल शेतकरी विजय जाधव यांच्या शेतावर करण्यात आला. Celebrate Gimvi Agriculture Day


पंचायत समिती गुहागर, तालुका कृषी विभाग, सामाजिक वनिकरण, ऑरगॅनिक प्रोड्यूसर कंपनी गुहागर व ग्रुप ग्रामपंचायत गिमवी-देवघरच्या संयुक्त विद्यमाने कृषी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतंर्गत घेण्यात आला. यावेळी हळद रोपांच्या लागवडीचा व कृषी संजीवनी मोहीमेचा समारोप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सरपंच वैभवी जाधव यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. Celebrate Gimvi Agriculture Day


या कृषी दिनाच्या निमित्ताने हळद लागवडीचे तंत्रशुध्द प्रात्यक्षिक व सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पं.स. कृषी विभागाचे व सामाजिक वनीकरण विभागाचे तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी कौतुकही केले. कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी हळद लागवडीच्या या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाबाबत व प्रात्यक्षिकातून प्रशिक्षणासह संपूर्ण तांत्रिक मुद्दे व या उपक्रमात वापरण्यात येणा-या सचिन कारेकर यांनी विकसित केलेल्या हळदीच्या स्पेशल कोकण-4 या वाणाबाबत सविस्तर माहिती दिली. Celebrate Gimvi Agriculture Day


यावेळी पं. समितीचे माजी उपसभापती सुनिल जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, उपसरपंच महेंद्र गावडे, सामाजिक वनिकरण अधिकारी महेंद्र डबडे, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, पं. स. चे कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, मंडळ कृषी अधिकारी शृंगारतळी बी. एस. कोळी, कृषी पर्यवेक्षक विकास पिसाळ, एस.एन. सानप, प्रभाकर जाबरे, कृषी सहाय्यक श्री. गवारी व तालुक्यातील कृषी सहायक, मंडळ अधिकारी श्री. काजरोळकर, तांत्रिक अधिकारी नयना जाधव, प्रगती बागकर, ग्रामसेवक व्ही. एम. वेलूंडे, तलाठी सचिन शिंदे, सामाजिक वनिकरण विभागाचे अमीत निमकर, प्रगतीशिल शेतकरी विजय जाधव, सुभाष जाधव, किशोर जाधव शेतकरी मुनवर घारे, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. Celebrate Gimvi Agriculture Day


उपस्थित सर्व मान्यवरांचे सरपंच वैभवी जाधव व कृषी अधिकारी श्री. धायगुडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक गजेंद्र पौनीकर यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मान्यवरांचे व तालुक्यातील शेतक-यांचे आभार कृषी अधिकारी आर. के. धायगुडे यांनी मानले. ग्रामरोजगारसेवक नितिन जाधव, ग्रामपंचायतीचे डाटा एन्ट्री ऑपरेटर मुक्ता सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी समीर जड्याळ, दिनेश बाईत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. Celebrate Gimvi Agriculture Day

