5 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
गुहागर, ता. 06 : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील मंडळ अधिकारी श्री. जाधव याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (५ ऑगस्ट) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास रंगेहात पकडल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. Caught accepting bribe in Savarde
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदीखताची नोंद करण्याचे काम गेल्या तब्बल दोन वर्षांपासून प्रलंबित ठेवण्यात आले होते. वारंवार पाठपुरावा करूनही काम होत नसल्याने तक्रारदाराला हेलपाटे मारावे लागत होते. अखेर ही नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी जाधव याने पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर बुधवारी सापळा रचण्यात आला. Caught accepting bribe in Savarde
त्यामध्ये जाधव याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे महसूल विभागातील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांची कामे महिनोनमहिने प्रलंबित ठेवून पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारींना या घटनेने पुन्हा एकदा खतपाणी मिळाले आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नागरिकांना अशा प्रकारे मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. Caught accepting bribe in Savarde
