रत्नागिरी, ता. 20 : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तरी या वर्षासाठी व्यवसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास इच्छूक असणा-या ज्या विद्यार्थ्यांना अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज तात्काळ सादर करावे, असे आवाहन संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी यांनी केले आहे. Caste validity certificate for professional studies

शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या असल्याने चालु शैक्षणिक वर्षात वैधता प्रमाणपत्र अभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये. यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही त्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा व त्या अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रासह साक्षकिंत प्रती जोडून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रत्नागिरी या कार्यालाकडे विलंबाबतच्या हमीपत्रासह त्वरित सादर करावी. Caste validity certificate for professional studies

जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थास आरक्षाणातून प्रवेश मिळाला नाही. तर त्यास जिल्हा जात पडताळणी समिती जबाबदार राहणार नाही, असे हमीपत्र अर्जदाराने अर्जाच्या प्रतीसोबत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. हमीपत्राचा नमुना बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तरी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरित अर्ज करावा, असे जिल्हा जात पडताळणी समिती, रत्नागिरी या समिती कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. Caste validity certificate for professional studies
