एकेरी विजेता राहुल कदम तर दुहेरी विजेते राहुल कदम व राजेंद्र कदम
गुहागर, ता. 12 : गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व कॅरम क्लब यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या गुहागर तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत एकेरी विजेता राहुल कदम तर दुहेरी विजेते पद राहुल कदम व राजेंद्र कदम यांनी पटकावले. Carrom competition concluded at Guhagar


गुहागर येथील भंडारी भवन येथे आयोजित करणाऱ्या या तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन गुहागर राष्ट्रवादी काँगस तालुका अध्यक्ष पद्माकर आरेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीधर बागकर, नरेश पवार, साहिल आरेकर, मंदार कचरेकर, राजेंद्र भागडे, प्रदिप परचुरे, मिलिंद शेटे, सचिन साखरकर, संदिप देवकर, हेमचंद्र आरेकर, दिपक शिरधनकर, सुनिल गोयथळे, मनोज बावधनकर, सौ.मानसी शेटे, तुषार सुर्वे, सुदाम कदम आदी मान्यवर उपस्थित होते. Carrom competition concluded at Guhagar


तालुक्यातील कॅरम क्रीडा स्पर्धकांना आपले करिअर करण्याची संधी कॅरम मध्ये पण आहे. आपल्या जिल्ह्यातच कॅरम खेळाडूंनी कॅरम मध्ये करिअर केल्याचं आपल्याला माहित आहे. यावेळी खेळाडूंनी जिल्हा व राज्यस्तरावर आपले नाव कमवावे असे पद्माकर आरेकर यांनी सांगितले. तर राष्ट्रवादीचे गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांनी सांगितले की, गुहागर तालुक्यात कॅरम स्पर्धा अजूनही कुठल्याही पक्षांनी आयोजित केलेल्या नाही. या प्रथमच राष्ट्रवादी पक्षाने आयोजित केले आहेत. अशा स्पर्धा नियमित घेणार असून गुहागरतील कॅरम खेळाडूंना पुढे येण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले यांनी सांगितले. Carrom competition concluded at Guhagar


या स्पर्धेत एकेरी उपविजेता आकाश कचरेकर तर दुहेरी उपविजेता-मनिष साखरकर, मिलिंद शेटे यांनी पटकावले. तसेच एकेरी उत्तेजनार्थ शैलेश शटे, मनिष साखरकर दुहेरी उत्तेजनार्थ- आकाश कचरेकर, प्रदीप परचुरे व मयुरेश साखरकर, निलेश गोळे यांनी पटकावले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन दीपक देवकर यांनी केले. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर शहर व गुहागर शहर कॅरम क्लब यांनी मेहनत घेतली. Carrom competition concluded at Guhagar

