रत्नागिरी, ता. 03 : येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात करिअर कट्टा विद्यार्थी संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले. Career Katta Workshop at Dev College
प्रमुख पाहुणे महाराष्ट्र माहिती व तंत्र सहायता केंद्राचे अध्यक्ष डॉ. शितोळे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात जगताना कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा, मोबाईलचा वापर किती व कशाप्रकारे करावा ते सांगितले. त्यांनी करिअर कट्टाबद्दल माहिती दिली. त्यात असणारे विविध उपक्रम, अनेक स्पर्धा परीक्षाची तयारी, आयएएस आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला या संधीबद्दल माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास व चांगले करिअर घडवण्यासाठी काय केले पाहिजे त्याबद्दल मार्गदर्शन केले. Career Katta Workshop at Dev College

महाविद्यालयाच्या प्र. प्रा. सौ. मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला करिअर कट्टा रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉ. शिवाजी उकरंडे व श्री. भादुले उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग प्रमुख व करियर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक प्रा. गौरी बोटके यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्या वसुंधरा जाधव, समन्वयक प्रा. गौरी बोटके उपस्थित होते. सर्व शाखेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. राखी साळगावकर यांनी केले. प्रा. सुप्रिया येरुलकर यांनी आभार मानले. Career Katta Workshop at Dev College