• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर येथे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

by Mayuresh Patnakar
March 25, 2023
in Guhagar
133 1
0
Career Guidance Workshop at Guhagar
261
SHARES
747
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना देखील सापडणार करिअरच्या वाटा

गुहागर, ता. 25 : परमपूज्य आई श्री कलावतीदेवी यांच्या भजनी मंडळाच्या वतीने गुहागर येथे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि. 1 एप्रिल 2023 रोजी स. 11 ते 1 ह्या वेळेत आठवी ते पंधरावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच कमी गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी कशा शोधायच्या याबाबतचे विशेष मार्गदर्शन प्रा. रुपाली तोरणेकर करणार आहेत. ही कार्यशाळा श्री दत्त मंदिर वरचापाट गुहागर येथे होणार आहे. Career Guidance Workshop at Guhagar

परमपूज्य आई श्री कलावतीदेवी भजनी मंडळ गुहागर वरचापाट यांच्या वतीने श्री दत्त मंदिर वरचापाट गुहागर येथे सोमवार दि. 27/03/2023 ते रविवार दि. 02/04/2023 पर्यंत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 27/03/2023 ते शनिवार दि. 01/04/2023 सायंकाळी 4 ते 5.30 संगीत भजन व अनुभव कथन, रात्रौ 9 ते 10.30 चातुर्मास एकादशी भजन व अनुभव कथन होणार आहे. रविवार दि. 2/4/2023 रोजी स. 8 ते 9 बालोपासना होईल. गुरुवार दि. 30 मार्च रोजी श्रीराम नवमी निमित्त रामनवमीचे भजन रात्रौ 9 ते 10.30 ह्या वेळेत होईल. साधकांनी दुपारच्या भजनाला येताना नेहमीच्या वारांच्या भजनाचे पुस्तक व रात्रीच्या भजनाला येताना श्रीहरी प्रेमलहरी हे उत्सवाच्या भजनाचे पुस्तक घेऊन यावे. Career Guidance Workshop at Guhagar

परमपूज्य आई श्री कलावतीदेवी सप्ताहामधील अनुभव कथनाच्या सतरात सुख समाधान नक्की कशात आहे, परमपूज्य आईच्या उपासनेमुळे आलेले अनुभव, परमपूज्य आईच्या सहवासातील आठवणी, कलियुगात देवीची प्राप्ती करून घेण्यासाठी सोपी तपश्चर्या, धकाधकीच्या जीवनात मानसिक संतुलन कसे टिकवता येईल, गुरु भजनाचा महिमा, स्वत चे नशीब स्वत च्या ताब्यात ठेवण्यासाठी उपाय, कमीत कमी श्रम खर्च करुन पुण्य कसे मिळवता येईल, दु खाचा समूळ नाश करण्याचा खात्रीलायक उपाय, श्रीराम कथा हे विषय आहेत. Career Guidance Workshop at Guhagar

करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

दहावी आणि बारावीच्या परिक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. या निर्णायक वळणावर करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांच्या अपेक्षे एवढे गुण त्यांना मिळतातच असे नाही. कमी गुण मिळूनही करिअरच्या विविध वाटा कोणत्या. एखादे क्षेत्र निवडताना त्याबद्दलची माहिती कशी मिळवावी. याचे संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी श्री दत्त मंदिर वरचापाट, गुहागर येथे शनिवार दि. 1 एप्रिल 2023 रोजी स. 11 ते 1 ह्या वेळेत  कार्यशाळेचे  आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला आठवी ते पंधरावीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा कार्यशाळेस सहभागी व्हावे. या कार्यशाळेत प्रा. रुपाली तोरणेकर (गावरस्कर), Electronics Department, VIT Engineering college, Pune या मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी 9307294347/ 9689068416 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Career Guidance Workshop at Guhagar

Tags: Career Guidance Workshop at GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share104SendTweet65
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.