स्व.सदानंद आरेकर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण
गुहागर, ता. 10 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण यांनी कोकणातील विद्यार्थी व महिलांसाठी विद्यार्थी करीअर मार्गदर्शन केंद्राव्दारे कौशल्य विकास आधारित विविध कोर्सेस सुरु केले आहेत. हे कोर्सेस करून युवकांना नोकराची संधी उपलब्ध करुन देत आहे. तरी विद्यार्थी व महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा. Career Guidance Center at Chiplun
यामध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ऑफिस असिस्टंट, ऍडव्हान्स ब्युटीशीयन, ऍडव्हान्स टेलरिंग, बेसिक टेलरिंग, गेस्ट हाऊस केअर टेकर, कस्टमर केअर एक्सिक्युटीव्ह, फॅशन डिझाईन, मेहंदी प्रशिक्षण, केक मेकिंग ट्रेनिंग, सिक्युरिटी गार्ड ट्रेनिंग, ज्वेलरी मेकिंग इत्यादी कोर्स घेतले जाणार आहेत. तसेच या कोर्सचा कालावधी 1 महिना, 2 महिना, 3 महिना असा राहिल. Career Guidance Center at Chiplun

विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित कोर्स करून नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. तसेच या कोर्सेसच्या फी मध्ये मोठ्या प्रमाणात सवलतही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यासह देशातील विविध हॉटेल, औद्योगिक कंपन्या, क्रूझ अश्या विविध क्षेत्राशी संलग्न असणाऱ्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर रोजगार निमिर्ती साठी महिला भगिनींसाठी देखील कौशल्य विकास आधारित काही प्रशिक्षण कोर्सेस आहेत. जेणेकरून त्या त्या कोर्सेस च्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी रोजगार निर्मिती करता येऊ शकते. अधिक माहितीसीठी संपर्क : 8483051399 / 8485851399, पत्ता : तहा हाइट्स, मुंबई-गोवा हायवे , चिपळूण शहर प्रांत ऑफिस शेजारी. Career Guidance Center at Chiplun

