• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महर्षी कर्वे संस्थेतर्फे करिअर मार्गदर्शन

by Guhagar News
March 18, 2023
in Ratnagiri
51 0
0
Career Guidance by Maharshi Karve Sansthan

प्रा.-विजय-नवले

99
SHARES
284
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी येथे २४ मार्चला मोफत समुपदेशन कार्यक्रम

रत्नागिरी, ता. 18 : इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व सर्व विद्यार्थी, पालकांसाठी शिरगावच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने येत्या २४ मार्चला मोफत समुपदेशन कार्यक्रम आयोजित केला आहे. एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने या समुपदेशन व बारावीनंतर विविध क्षेत्रातील सुवर्णसंधींवर मार्गदर्शन कार्यक्रमात करिअर पाथ निर्मितीमध्ये विश्वविक्रम करणारे प्रा. विजय नवले मार्गदर्शन करणार आहेत. Career Guidance by Maharshi Karve Sansthan

शुक्रवारी २४ मार्चला सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत जि. प. जवळील मराठा भवन मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. प्रा. विजय नवले यांनी गेल्या २३ वर्षांत राज्यभरात ३५०० हून अधिक करिअर व्याख्याने दिली आहेत. अभ्यासपूर्ण मांडणी, ओघवती वक्तृत्वशैली, रंजक किस्से ते व्याख्यानादरम्यान सांगतात. प्रा. नवले यांनी सुमारे २६०० कार्यक्षेत्रांचा सूक्ष्म अभ्यास करून ६७,१०० करिअर मार्गांचे संशोधन केले. संपूर्ण जगात असा अभ्यास व करिअर मार्गांची तक्ता स्वरूपात प्रथमच निर्मिती केल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने या विक्रमाची नोंद करून सन्मानित केले आहे. Career Guidance by Maharshi Karve Sansthan

प्रा. नवले यांनी दै. सकाळ, लोकमत, पुढारी, प्रभात, सामना, टाइम्स ऑफ इंडिया यासह विविध वृत्तपत्रांमध्ये करिअरविषयक विपुल लेखन केले आहे. आकाशवाणी, दूरदर्शन आणि विविध वृत्तवाहिन्यांवरूनही ते करिअर मार्गदर्शन करतात. करिअर निर्णय या जगातील पहिल्या करिअर कॅलेंडरचे लेखन व संपादन प्रा. नवले यांनी केले आहे. असे दिग्गज व्यक्तीमत्व रत्नागिरीत प्रथमच येत असून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन फॉर वुमेन्सने केले आहे. अधिक माहितीसाठी 9420274119 किंवा 797297567 या क्रमांकावर संपर्क साधावा. Career Guidance by Maharshi Karve Sansthan

Tags: Career Guidance by Maharshi Karve SansthanGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share40SendTweet25
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.