गुहागर, ता. 08 : शासनाच्या कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीमे अंतर्गत गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी कर्करोग प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. या मोहीमेचे उद्घाटन डॉक्टर वैभव विणकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. Cancer screening campaign at Guhagar Hospital


यावेळी ग्रामीण रुग्णालयातून मिळालेल्या माहितनूसार महिलांमध्ये स्तनांचे, गर्भाशयाचे तसेच तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये याबाबतचे प्राथमिक टप्प्यातील स्क्रीनिंग केल्यानंतर यामध्ये संशयित लक्षणे आढळल्यास पुढील तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय रत्नागिरी तसेच डेरवण येथे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. यावेळी डॉक्टर निलेश ढेरे, दंत शल्यचिकित्सक सागर हलगे, परिचारिका रसिका पवार, मेघना कानडे, दीपक मांजरेकर, सुहास जांभळे, सुधाकर मयेकर व रुग्ण उपस्थित होते. Cancer screening campaign at Guhagar Hospital