विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेची 6 जानेवारी 2023 पासून मोहीम सुरु – केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
गुहागर, ता. 18 : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि सीएसआयआरचे (विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद) उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र सिंह यांनी, 6 जानेवारी 2023 रोजी सीएसआयआरची “एक आठवडा, एक प्रयोगशाळा” ही देशव्यापी मोहीम सुरू होणार असल्याचे घोषित केले. या अंतर्गत, देशभरातील सीएसआयआरच्या 37 प्रमुख प्रयोगशाळा/संस्थांपैकी प्रत्येक प्रयोगशाळा/संस्था दर आठवड्याला, एकामागून एक, भारताच्या जनतेसमोर, आपला आगळा नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विषयक प्रगती प्रदर्शित करतील. Campaign of Council of Science and Industry
नवी दिल्ली येथील विज्ञान केंद्रात सीएसआयआरच्या 200 व्या नियामक मंडळाच्या बैठकीला संबोधित करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले,’ एक आठवडा, एक प्रयोगशाळा’ या संकल्पनेवर आधारित मोहीम, सखोल तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांच्या माध्यमातून नव्या संधी शोधण्यासाठी युवा नवोन्मेषी, विद्यार्थी, स्टार्टअप्स, शिक्षण क्षेत्रामधील अभ्यासक आणि उद्योगांच्या विचारांना चालना देईल. Campaign of Council of Science and Industry
भारताचे नवोन्मेषाचे इंजिन
बैठकीत, डॉ जितेंद्र सिंग यांनी महिला शास्त्रज्ञांसाठी संशोधन अनुदान प्रस्तावाच्या विशेष निर्णयाची घोषणा केली. संशोधन अनुदान प्रस्तावाचा निर्णय अशा महिला शास्त्रज्ञांसाठी आहे, ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ब्रेक (काही काळासाठी रजा) घेतला आहे आणि संशोधनात परत येऊन आपली कारकीर्द पुन्हा स्थापित करण्यामध्ये त्यांना स्वारस्य आहे. सीएसआयआर मध्ये होत असलेल्या परिवर्तनांशी सुसंगत राहून, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांनी ‘सीएसआयआर, भारताचे नवोन्मेषाचे इंजिन’ हे नवे घोषवाक्य देखील जारी केले. Campaign of Council of Science and Industry