• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्राम. कातळेमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत शिबिर संपन्न

by Guhagar News
May 15, 2023
in Guhagar
74 0
0
Camp under Maharajswa Mission in Katale
145
SHARES
413
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर ता. 15 : कातळे ग्रामपंचायतीमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत तहसीलदार सौ.प्रतिभाताई वराळे यांच्या पुढाकाराने आणि सरपंच सौ.प्रियंका सुर्वे यांच्या कौशल्यपुर्ण नियोजनाने शिबिर घेण्यात आले. यावेळी शासकीय विभागांच्यावतीने चार महसुल गावातील नागरिकांना विविध योजनांची व दाखल्यांची माहिती देण्यात आली. Camp under Maharajswa Mission in Katale

सर्वसामान्यांच्या विकासाची आणि महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसार दिनांक 12 मे 2023 रोजी कातळे ग्रामपंचायती मध्ये गुहागर तालुक्यातील पहिले शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये तवसाळ, तवसाळ खुर्द, काताळे, पडवे या गावातील लाभार्थ्यानी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. या शिबिरामध्ये महसुल विभाग, तालुका कृषी कार्यालय, पंचायत समिती कृषी कार्यालय, पुरवठा विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व इतर शासकीय विभागांच्यावतीने या चार महसुल गावातील नागरिकांना विविध योजनांची, दाखल्यांची माहिती देण्यात आली. विविध दाखल्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले, जनजागृती करण्यात आली. विशेष करून संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचे उत्पन्न दाखलांचे प्रस्ताव करून घेण्यात आले. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे शालेय विद्यार्थी, संजय गांधी – श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी व इतर कारणांकरता आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यांच्या लाभार्थींना या शिबिराचा मोठा फायदा झाला. Camp under Maharajswa Mission in Katale

या गुहागर तालुक्यातील पहिल्या होणाऱ्या शिबिराचा लाभ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्वाना होण्याकरता ग्रामविकास अधिकारी श्री.महेंद्र निमकर,उपसरपंच प्रसाद सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर अजगोलकर, जद भाटक राजश्री कुळे, विनायक बारस्कर, नम्रता निवाते, श्रावणी नाचरे, वैभवी यद्रे या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी अथक प्रयत्न केले. तर संपुर्ण शिबिर नियोजन पद्धतीने यशस्वी होण्याकरता कातळे ग्रामपंचायत लिपिक अमोल सुर्वे पडवे, नईम मुजावर, दीपक बारस्कर,सोनाली पंडित, ओंकार गडदे यांनी विशेष मेहनत घेतली. या शिबिरासाठी सर्व सोयीने युक्त असे ठिकाण आवश्यक असताना पडवेच्या माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच सौ.मानसी विनायक सुर्वे यांनी आपल्या निवासस्थानी या शिबिराकरता जागा उपलब्ध करून दिली. भविष्यातही ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना आवश्यक सोयी सुविधांकरता, अनेक प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्याकरता सन्मा. तहसीलदार सौ.वराळे मॅडम. गटविकास अधिकारी सन्मा.राऊत साहेब आणि सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्याचा मानस सरपंच सौ प्रियंका निलेश सुर्वे यांनी यावेळी व्यक्त केला. Camp under Maharajswa Mission in Katale

काताळे ग्रामपंचायतीने या शिबिराचे केलेले नेटके नियोजन आणि लाभार्थ्यांनी घेतलेला सहभाग याबाबत तहसीलदार  सौ.प्रतिभाताई वराळे, गटविकास अधिकारी श्री. प्रशांत राऊत आणि काताळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांकडुन सरपंच सौ प्रियंका सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे. Camp under Maharajswa Mission in Katale

यावेळी तालुक्याच्या तहसीलदार महोदया सन्मा. सौ प्रतिभाताई वराळे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री केळसकर, तालुका कृषी अधिकारी श्री क्षीरसागर, मंडळ अधिकारी व्ही.व्ही.मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी घुगे, पंचायत समिती कृषी अधिकारी गजेंद्र पवनीकर, राजकुमार धायगुडे, श्री.संके, श्री.वासावे, पशुवैद्यकीय अधिकारी हळदनकर, तलाठी श्रीमती.राधा आघाव, श्री.परीहार, श्री.निलेश पाटील आदींसह बहुसंख्य शासकीय कर्मचारी या शिबिराच्या ठिकाणी उपस्थित होते. Camp under Maharajswa Mission in Katale

Tags: Camp under Maharajswa Mission in KataleGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSanjay Gandhi YojanaShravanbal YojanaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजश्रावणबाळ योजनासंजय गांधी योजना
Share58SendTweet36
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.