विख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. शरद सावंत यांचे द्वारे व्हेरिकोज व्हेन्स, फिशर, फिस्टूला, विद्रुप व्रण यावर तपासणी व उपचार
गुहागर, ता. 13 : चिपळूण येथील स्प्रिंग क्लिनिक येथे दिनांक 15 जून रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत विख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर शरद सावंत यांचे व्हेरिकोज व्हेन, मुळव्याध, फिशर व फिस्टूला तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Camp at Spring Clinic Chiplun
आपल्या पायात अशुद्ध रक्त वाहून नेण्यासाठी त्वचेच्या खाली मुख्यत: दोन मोठय़ा रक्तवाहिन्या (शिरा) असतात. या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणाने रक्त जमा होते आणि त्यामुळे त्या शिरा फुगतात. या त्रासाला व्हेरिकोज व्हेन्स (varicose veins) असे म्हणतात. पाय सुजणे, पाय दुखणे, पायामध्ये असहजता निर्माण होणे, असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे ही प्रमुख लक्षणे आहेत. अनेकदा पाय फार दुखतोय् असे आपल्याला जाणवते. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ही कारणे घेऊन डॉक्टरांकडे जाणाऱ्या बऱ्याच लोकांना व्हेरिकोज् व्हेन्सचा त्रास असल्याचे आढळून येते. याशिवाय नसा निळ्या फुगलेल्या दिसतात, क्वचित पाय देखील काळवंडलेला असतो. विशेषतः घोट्याच्या वरचा भाग काळवंडलेला असतो. कधी कधी अल्सर अथवा जखम निर्माण होते व ती भरून निघत नाही. वरीलपैकी कोणताही त्रास असलेल्या नागरिकांना उपचार घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. Camp at Spring Clinic Chiplun
डॉ. शरद सावंत यांचा प्लास्टिक सर्जरी, रक्त वाहिन्यांच्या संदर्भातील आजार, व्हेरिकोज व्हेन्स (लेसर उपचार), भाजलेल्या रुग्णांवर उपचार, डायबेटिज मुळे बऱ्या न होणाऱ्या जखमा या वरील उपचार, दुभंगलेले ओठ, टाळू यावरील शस्त्रक्रिया, जन्मजात आलेले अपंगत्व, शरीरावरील असलेल्या (कॅन्सरच्या) गाठी या वर उपचार, हेअर ट्रान्सप्लांट. यामध्ये देखील खास हातखंडा आहे. Camp at Spring Clinic Chiplun
शिबिरातील व्हेरिकोज व्हेन्स, फिशर, फिस्टूला रुग्णांना लेझर द्वारे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. लेदर द्वारे शस्त्रक्रिया केल्याने जखमा होत नाहीत, वेदना होत नाहीत, रक्तस्त्राव होत नाही, इन्फेक्शन चा धोका फारच कमी होतो, वेळेची बचत होते, रुग्ण लवकरात लवकर किंवा त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. यानिमित्ताने व्हेरिकोज व्हेन्स च्या लेझर द्वारे शस्त्रक्रिया ही सुविधा चिपळूण मध्येच उपलब्ध झाली असून रुग्णावर सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. Camp at Spring Clinic Chiplun
तरी अधिक माहिती व नावनोंदणी करिता 9730906216, 02355 261234, 02355260677 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन स्प्रिंग क्लिनिक व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे. Camp at Spring Clinic Chiplun