पश्चिम विभागीय अध्यक्ष मुर्तझा काचवाला व पदाधिकाऱ्यांची शाखेला भेट
रत्नागिरी, ता. 05 : आगामी अर्थसंकल्पाच्या दृष्टीने सीए इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष, विद्यार्थी, उद्योजक आदींची भेट घेऊन त्यांच्या मागण्या व सूचना घेत आहोत. या सूचना सीए इन्स्टिट्यूटकडे सुपुर्द केल्या जाणार आहेत. त्याकरिता आम्ही पश्चिम विभागातील सीए इन्स्टिट्यूटच्या ३५ शाखांना भेटी देत आहोत, अशी माहिती सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागीय समितीचे अध्यक्ष सीए मुर्तझा काचवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. CA Institute Ratnagiri
३ ते ७ जानेवारी या कालावधीत रत्नागिरी शाखेतर्फे स्थापना सप्ताह साजरा होणार आहे. त्याअंतर्गत शाखेतील वरिष्ठ व माजी अध्यक्षांचा सत्कार, विविध महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांकरिता सीए शाखेमार्फत करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शाखाध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर यांनी दिली. CA Institute Ratnagiri
सीए काचवाला म्हणाले की, शाखा भेटीदरम्यान सूचना लक्षात घेऊन त्याचा अहवाल केंद्रीय कमिटीला देतो. यापूर्वी आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे, अतुल सावे यांची भेट घेतली. वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ अकाउंटंटस् ही परिषद मुंबईत झाली. यात १२३ देशांतील १२ हजार जण आले होते. पृथ्वी, पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. टॉप एक हजार उद्योग, कंपन्यांना त्यांनी वर्षभरात विजेचा किती वापर केला यासाठी १६ शाश्वत मानके काढली आहेत. त्याचे सोशल ऑडिट करावे लागेल. CA Institute Ratnagiri
सीए प्रॅक्टीस, आर्टिकलशिप, इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षा याबाबतही माहिती या वेळी मान्यवरांनी दिली. नव्या बदलांनुसार सीए अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय मानकांचा, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच इन्स्टिट्यूटतर्फे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्याचा लाभ घ्यावा. फक्त बीकॉम होऊन चालणार नाही, एखादा विषय घेऊन त्यात पारंगत झाले पाहिजे, या दृष्टीने हे अभ्यासक्रम रत्नागिरीमध्येही सुरू आहेत. अधिक माहितीसाठी शाखा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन या वेळी सीए अर्पित काबरा यांनी केले. CA Institute Ratnagiri

मंगळवारी दुपारी रत्नागिरी शाखेला भेट देण्यासाठी सीए काचवाला आले असता त्यांच्यासमवेत पत्रकार परिषदेला प. विभागीय समितीचे कोषाध्यक्ष सीए पियुष चांडक, रत्नागिरी शाखेचे पालक प्रतिनिधी सीए अर्पित काबरा, सीए पिंकी केडिया यांच्यासमवेत रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर, उपाध्यक्ष सीए मुकुंद मराठे, कोषाध्यक्ष सीए केदार करंबेळकर, विकासा चेअरमन सीए अभिलाषा मुळ्ये, सीए शैलेश हळबे, सीए अक्षय जोशी आदी उपस्थित होते. CA Institute Ratnagiri