रत्नागिरी, ता. 29 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून सीए अभिलाषा भूषण मुळ्ये यांची निवड झाली. त्यांनी नुकताच अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारून कामाला प्रारंभ केला. वर्षभरात सीए, व्यापारी, विद्यार्थी आणि महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करू, असे त्यांनी सांगितले. CA Institute Branch President Abhilasha Mulye


नव्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर, कोषाध्यक्ष आणि पश्चिम भारत सीए विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए अक्षय जोशी, मावळते अध्यक्ष सीए मुकुंद मराठे आणि सदस्य सीए प्रसाद आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे. पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमावेळी माजी अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये, माजी अध्यक्ष सीए बिपीन शाह, माजी अध्यक्ष सीए आनंद पंडित उपस्थित होते. त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. CA Institute Branch President Abhilasha Mulye
सौ. अभिलाषा मुळ्ये ह्या मे १९९८ मध्ये सीए झाल्या. सुरवातीला एक वर्ष नोकरी केली. सन २००० मध्ये लग्नानंतर रत्नागिरीत आल्या आणि सीए प्रॅक्टिस सुरू आहे. २०२२ मध्ये त्या सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम भारत सीए विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष (विकासा) आणि गेल्या वर्षी उपाध्यक्ष व आता अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. त्यांना गायन व लेखनात रुची असून त्या कुसुमताई पतसंस्थेच्या माजी संचालिका आहेत. कलारंग या संस्थेच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. CA Institute Branch President Abhilasha Mulye