गुहागर, ता. 17 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 23/ 04/2023 रोजी सकाळी 10 ते 4 यावेळेत मु. पो. वरवेली चिरेखाण फाटा, ता. गुहागर येथे जिल्हास्तरीय मुकबधीर-कर्णबधिर दिव्यंगांसाठी मोफत व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिरासाठी मार्गदर्शन करण्याकरिता मुकबधीर विद्यालय रत्नागिरीचे माजी प्राचार्य. मा. श्री फाटक व संस्थेचे सल्लागार मा. श्री.अरुण मुळे हे उपस्थित राहणार आहेत. Business Guidance Camp for the Handicapped
या शिबिरामध्ये दिव्यांगाना स्वताचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कागदाच्या लगद्यापासून विविध प्रकारचे फळे तसेच कागदापासून अनेक प्रकारच्या उपयुक्त वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मुकबधीर -कर्णबधिर दिव्यांगानी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन या व्यवसाय मार्गदर्शन शिबिरासाठी उपस्थित राहवे, अशी विनंती करण्यात आली आहे. Business Guidance Camp for the Handicapped

या शिबिरासाठी वयोमर्यादा 16 वर्षापुढील ठेवण्यात आले असून शिक्षणाची कोणतीही अट नाही. या शिबिरासाठी येताना 1) अपंगतत्वांचा दाखला 2)आधार कार्ड 3) रेशनिंग कार्ड 4)पासपोर्ट साईझ फोटो 1 5) युनिक कार्ड (असल्यास) यांच्या झेरॉक्स प्रति सोबत घेऊन याव्यात. Business Guidance Camp for the Handicapped
सहभागी दिव्यांगाना शिबिराच्या ठिकाणी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यवसाय मार्गदर्शन शिबिरासाठी प्रवेश क्षमता मर्यादित असल्यामुळे इच्छुक दिव्यंगाणी खालील नंबर वर संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. असे गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थे मार्फत कळविण्यात आले आहे. Business Guidance Camp for the Handicapped
1) श्री.प्रकाश अनगुडे सर-7218697247
2) श्री.सुनील मुकनाक -7350832024
3) श्री.सुनील रांजाने – 9420188297
4) श्री.अनिल जोशी – 9422635194
( टीप – वाचकांनी ही पोस्ट गरजू दिव्यांगांपर्यंत पोहचवण्यासाठी जास्तीत जास्त आपल्या ग्रुपवर शेअर करावी.) Business Guidance Camp for the Handicapped
