• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ४९६३ बसेस फुल्ल

by Guhagar News
September 2, 2024
in Ratnagiri
166 1
1
ST Employees Strike
326
SHARES
930
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई,  ता. 02 : गणेशोत्सव आणि कोकण हे एक अनोखं समीकरण आहे. कोकणात गणेशोत्सवाचा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या फार मोठी असते. गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी पहिली पसंती राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला दिली आहे. मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या सर्व एसटी बसेस फुल्ल झाल्या आहेत. Buses going to Konkan are full for Ganeshotsav

येत्या 7 सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. कोकणात गणपतीसाठी एसटीच्या ४२०० गट आरक्षणासह एकूण ४९५३ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत. मुंबईतून कोकणात गणपती उत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा 03 सप्टेंबर ते 07 सप्टेंबरदरम्यान 5000 जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. Buses going to Konkan are full for Ganeshotsav

मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतुट नाते आहे. मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत फक्त एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. Buses going to Konkan are full for Ganeshotsav

Tags: Buses going to Konkan are full for GaneshotsavGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKonkanLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarकोकणगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share130SendTweet82
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.