ग्रामपंचायत सदस्याला केली मारहाण; पोलीस स्थानकात तक्रार दाखल
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी गेल्या अनेक महिन्यांपासून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. वाळू उपसा करणाऱ्यांकडे महसूलची मेहेरनजर असल्याने आतापर्यंत कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. दरम्यान, सुरू असलेल्या वाळू उपशाबाबत जाब विचारणाऱ्या येथील ग्रामपंचायत सदस्याला वाळू व्यवसाय करणाऱ्या भावंडांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. Bullying of sand businessmen in Palshet
समुद्राची बेसुमार वाळू उपसा होत असतानाही कारवाई होत नसल्याने गुहागरवासिय आश्चर्य व्यक्त करत आहेत. पालशेत समुद्रकिनारी रात्री ८.३० ते पहाटे पर्यंत वाळू उपसा केला जातो. हा उपसा सुरू असताना कोणी अधिकारी कारवाईसाठी आल्यास त्यापासून सावधानी म्हणून पालशेत बाजारपेठेत या वाळू व्यावसायिका पैकी एकजण ठाण मांडून बसलेला असतो. येथील वाळू व्यवसायाबद्दल विचारणा केली असता, आम्ही सर्व प्रशासनाला मॅनेज करतो. त्यामुळे आम्ही कोणाच्या तक्रारीला घाबरत नाही, असे सांगतात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या येथील किनाऱ्यावरील वाळू उपशामुळे पावसाळ्यात समुद्राचे पाणी लगतच्या बागायतींमध्ये शिरते. Bullying of sand businessmen in Palshet


दरम्यान, पालशेत ग्रामपंचायत सदस्य पंकज बिर्जे हे याठिकाणी होत असलेल्या वाळू उपशाबाबत पाहणी करण्यासाठी आले असता, वाळू व्यावसायिक अजय नागवेकर आणि विजय नागवेकर या दोघांनी बिर्जे यांच्या गाडी समोर दुचाकी आडव्या करून शिवीगाळ करून मारहाण केली. व्यावसायिकांनी सरपंचाच्या देखत ही मारहाण झाली आहे. या मारहाणीत पंकज बिर्जे यांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी बिर्जे यांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Bullying of sand businessmen in Palshet
पालशेत समुद्रकिनारी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचा मुजोरपणा नेमका कोणाच्या जीवावर सुरू आहे असा सवाल नागरिकांनी केला आहे. Bullying of sand businessmen in Palshet