• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वडद येथे वाघाच्या हल्ल्यात दोन पाड्यांचा मृत्यू

by Ganesh Dhanawade
November 2, 2022
in Guhagar
22 1
0
Bulls killed in tiger attack
44
SHARES
125
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वडद डाफळेवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात दोन पाड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मानवी वस्तीत वन्य प्राण्यांचा वावर वाढत आहे. त्याचप्रमाणे बिबटे व वाघाचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले देखील वाढत आहेत. Bulls killed in tiger attack

गुहागर तालुक्यातील वडद डाफळेवाडी येथे राजाराम भाग्या जोगळे यांनी मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपली गुरे चरण्यासाठी जंगलात सोडली होती. मात्र नेहमीप्रमाणे दुपारी गुरे आणण्यासाठी ते जंगलात गेले असता त्यातील 6 गुरे घरी परत आली. तर 3 गुरे घरी न आल्याने श्री. जोगळे यांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी दोन पाडे वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याचे त्यांना दिसून आले. तर 1 पाडा जिवंत जंगलामध्ये आढळून आला. वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाड्यांमध्ये एक 18 महिन्याचा तर एक 10 महिन्याचा पाडा असल्याचे शेतकरी राजाराम जोगळे यांनी सांगितले. Bulls killed in tiger attack

एकीकडे अवकाळी पाऊस, लम्पिसारखे आजार असताना जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात अशाप्रकारे पाळीव जनावरांवर हल्ले होऊन ती मृत्युमुखी होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तरी वनविभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. Bulls killed in tiger attack

Tags: Bulls killed in tiger attackGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet11
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.