7 गुरे जखमी, 30 वर्षांहून अधिक जूना साकव होता दुरूस्तीच्या प्रतिक्षेत
गुहागर, ता. 3 : Bull dies after iron bridge collapses तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी साकव सोमवारी (ता.3) सायंकाळी 6 च्या दरम्यान मोडून नदीत कोसळला. या दुर्घटनेमध्ये साकवावरुन चालणारी 10 ते 12 गुरे नदीपात्रात पडली. गुरांवरच साकवाचा लोखंडी सांगाडा पडल्याने ही गुरे अडकली. त्यात 1 बैलाचा गुदमरुन मृत्यू झाला तर 7 गुरे जखमी झाली आहे. दोन वाड्यांमधील 30 ते 40 ग्रामस्थांनी नदीपात्रात पडलेला साकव बाजुला सारुन अडकलेल्या गुरांना बाहेर काढले. Bull dies after iron bridge collapses

Bull dies after iron bridge collapses
Guhagar तालुक्यातील कुटगिरी गावातील नदीवरील सुमारे 30 वर्षांपूर्वी लोखंडी साकव घालण्यात आला होता. या साकवावरुन नदीपलीकडे शेती, काजुच्या बागांकडे जाण्यासाठी ग्रामस्थ वापर करत असतं. गायरान असल्याने गुरांनाही याच साकवावरुन अनेक वर्ष पलीकडे चरायला नेले जात असे. नित्यनेमाप्रमाणे आजही दिलीप गुरव, शत्रुघ्न खेतले, सुरेश खेतले आदींची गुरे याच साकवावरुन पलीकडे गेली होती. सायंकाळी 6 च्या दरम्यान 10 ते 12 गुरे याच साकवावरुन परत येत असताना हा लोखंडी साकव मोडला आणि नदीत कोसळला. साकवावरील गुरेही नदीत कोसळली. दुर्दैवाने लोखंडी साकवाखाली पाण्यात काही गुरे अडकली. घटना कळताच हातातील कामे टाकून गावठाणवाडीसह आणखी एका वाडीतील ग्रामस्थ नदीपर्यंत आले. पाऊसामुळे नदीपात्रात पाणीही खूप होते आणि प्रवाहलाही वेग होता. तरीही ग्रामस्थांनी लोखंडी साकवात अडकलेल्या गुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु केला. दुर्दैवाने या अपघातात दिलीप गुरव (लिंगायत) यांचा एक बैल दगावला. तर अन्य 15 गुरांना बाहेर काढण्यात यश आले. त्यापैकी शत्रुघ्न गणपत खेतले यांची 5, सुरेश राजाराम खेतले यांचे 1 व मारुती भिवाजी खेतले यांचे 1 अशी एकूण 7 गुरे जखमी झाली आहेत. Bull dies after iron bridge collapses

कुटगिरीतील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हा जुना साकव बदलण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली होती. मात्र या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले होते. नुकतीच या पुलाची पहाणी बांधकाम विभागाने केली होती. येथे नवी व्यवस्था उभी करण्याचे कामही प्रशासनाने हाती घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र त्यापूर्वीच ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच तहसीलदार, महसुल प्रशासन, अन्य संबंधित यंत्रणांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. Bull dies after iron bridge collapses
