• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 August 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राम मंदिर देणगी मोजणी प्रकरण

by Mayuresh Patnakar
August 3, 2026
in Bharat
35 1
1
Shri Ram Temple Ayodhya
69
SHARES
198
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मंदिर व्यवस्थापनाची भूमिका केवळ पर्यवेक्षकीय; सर्व व्यवहार पारदर्शक असल्याचा तीर्थक्षेत्राचा खुलासा

अयोध्या, ता. 03 : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगी मोजणी केंद्रात घडलेल्या चोरीच्या घटनेनंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने वस्तुस्थिती स्पष्ट करत मंदिराच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कोणतीही अनियमितता नसल्याचा दावा केला आहे. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, ही चोरी मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित नसून, देणगी मोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे. Shri Ram Temple Ayodhya

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे ३,३०० कोटी रुपयांच्या देणग्या प्राप्त झाल्या. यापैकी सुमारे १,८०० कोटी रुपये मंदिर बांधकामासाठी तर ४०० कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च करण्यात आले. या निधीचे सखोल लेखापरीक्षण करण्यात आले असून, बांधकाम एल अँड टी (L&T) कंपनीने आयआयटी रुरकी, आयआयटी चेन्नई, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. Shri Ram Temple Ayodhya

ट्रस्टने स्पष्ट केले की, मंदिराच्या बांधकाम साहित्याच्या खरेदीमध्ये त्यांची थेट भूमिका नव्हती. सर्व खरेदी एल अँड टीमार्फत करण्यात आली. तसेच भूसंपादनासाठी कोणत्याही प्रकारे रोख व्यवहार करण्यात आले नाहीत. सर्व देयके अधिकृत बँक खात्यांद्वारे संबंधित जमीनमालकांच्या खात्यात थेट वर्ग करण्यात आली. Shri Ram Temple Ayodhya

मंदिराशी संबंधित आर्थिक व्यवहारांसाठी बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक या तीन राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एकूण २२ स्वतंत्र बँक खाती असून, प्रत्येक खर्चासाठी स्वतंत्र खाते वापरले जाते. सर्व व्यवहार धनादेश किंवा नेट बँकिंगद्वारेच केले जातात आणि त्यांचे नियमित लेखापरीक्षण केले जाते. मंदिरात येणाऱ्या देणग्या यूपीआय, बँक खाते आणि हुंडी या माध्यमातून स्वीकारल्या जातात. एकूण देणग्यांपैकी सुमारे ८० टक्के रक्कम हुंडीतून प्राप्त होते. मंदिराला मिळालेल्या रोख रकमेव्यतिरिक्त सोन्या-चांदीसह इतर मौल्यवान वस्तूंची स्वतंत्र नोंद ठेवली जाते. या वस्तू मंदिर आणि बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या असून, संबंधित देणगीदारांना आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाते. Shri Ram Temple Ayodhya

देणगीची मोजणी महिन्यातून २२ दिवस केली जाते. यासाठी दोन कुलूप प्रणाली, कडक सुरक्षा व्यवस्था आणि स्टेट बँक ऑफ इंडियासोबतचा सामंजस्य करार (एमओयू) लागू आहे. मंदिर व्यवस्थापनाची भूमिका केवळ कुलूपबंद हुंड्या बँकेकडे सुपूर्द करणे आणि मोजणीसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे एवढीच आहे. Shri Ram Temple Ayodhya

ट्रस्टच्या माहितीनुसार, देणग्यांची मोजणी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, रोख रकमेची हाताळणी आणि बँकेत जमा करण्याची संपूर्ण जबाबदारी बँकेची आहे. या कामासाठी बँकेने सैनिक सुरक्षा समिती (SSS) या संस्थेच्या सेवाही घेतल्या आहेत. त्यामुळे, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी मोजणी केंद्रात झालेली चोरी ही बँकेच्या कार्यपद्धतीशी संबंधित घटना असून, मंदिर व्यवस्थापनाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळलेला नसल्याचे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने स्पष्ट केले आहे. Shri Ram Temple Ayodhya

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShri Ram Temple Ayodhyaटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share28SendTweet17
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.