• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

३ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

by Manoj Bavdhankar
February 2, 2023
in Bharat
343 4
0
Budget 2023
674
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अर्थमंत्री निर्मला सीतारामन; ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली, ता. 02 :  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. 2024 च्या निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शून्य कार्बन उत्सर्जनासाठी 35 हजार कोटींचा निधी, शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म, आदिवासींच्या विकासासाठी निधी आदी महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी अर्थमंत्र्यांनी केल्या. Budget 2023

निर्मला सीतारामन यांचा परिचय

इंदिरा गांधींनंतर देशाच्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी कार्यभार सांभाळला. आज सलग पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यांने सलग पाच अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री त्यांनी इतिहास रचला आहे. 30 मे 2019 रोजी भारताच्या अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांनी पदभार स्वीकारला, ते आजतायत अर्थमंत्री पदाची सूत्रे त्याच्याच हाती आहेत. निर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षात 2006 साली प्रवेश करत राजकीय कारर्किदीला प्रारंभ केला. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून 2010 साली सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आली. नरेंद्र मोदींचा 2014 साली ऐतिहासिक विजय झाला. निर्मला सीतारामन यांनी नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाचे राज्यमंत्री पद सांभळले. त्यानंतर सीतारामन यांच्याकडे पूर्णवेळ संरक्षण मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला. वास्तविक येथेच सीतारामन यांनी इतिहास रचला होता. कारण पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात सीतारामन यांना अर्थमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. खरे म्हणजे सीतारामन यांची इतिहास रचण्याची ही दुसरी वेळ होती, यापूर्वी 1970-71 मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदासोबतच अर्थ खाते सुद्धा स्वत:कडे ठेवले होते. मात्र सीतारामन याच खऱ्या अर्थाने भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या. Budget 2023

Budget 2023

सरत्या आर्थिक वर्षाचा आढावा

अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन म्हणाल्या की, कोरानाच्या जागतीक महामारीत भारत सरकारने निश्चित केलेल्या धोरणांचे जगात स्वागत झाले. कोविड लसीकरणाचे कौतुक जगाने केले. पैशाच्या डिजिटल देवाणघेवाणीसाठी देशात अत्यंत कमी कालावधीत प्रभावशाली योजना स्थीर करण्यात आले. त्यामुळे जगाने भारताचे महत्त्व मान्य केले आहे. आज भारताची अर्थव्यवस्था जगातील 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.  देशात 11.7 कोटी शौचालयांची उभारणी,  उज्जवला योजनेतंर्गत 9.6 एलपीजी कनेक्शन,  102 कोटी लोकांसाठी 212 कोटी कोरोना लसी, कृषी सन्मान योजनेअंतर्गत 11.4 कोटी शेतकऱ्यांना खात्यात पैशाचं थेट हस्तांतरण करण्यात आले. – EPFO मधील खात्यांची संख्या वाढली. कोरोना महामारीच्या काळात सलग 28 महिने, देशातील 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. ही योजना पुढील वर्षभर सुरू रहाणार आहे. Budget 2023

Budget 2023

अर्थसंकल्पातील सप्तर्षी

पुढच्या अर्थसंकल्पाची उद्दीष्टांचे वर्णन त्यांनी सप्तर्षी असे केले. सर्वसमावेशक विकासपट, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणे, हरित विकास, तरुणांचं सामर्थ्य, आर्थिक क्षेत्र  ही सप्तपदी डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प बनविण्यात आला आहे. Budget 2023

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

महिलांचे आर्थिक सबलीकरण, बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचा विकास, देशातील शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म, कापुस उत्पादनातून शेतकऱ्यांना नफा मिळण्यासाठी प्रयत्न, भरड धान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी हैदराबादला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स स्थापना, पर्यावरण संवधर्नसाठी विशेष प्रयत्न, ग्रीन ग्रोथच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर, देशात 157 नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करणे, आदिवासी विकास मिशन अंतर्गत 38800 शिक्षकांची नियुक्ती, गरीब कैद्यांच्या जामिनासाठी आर्थिक मदत, पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटी रुपये, पीएम आवास योजनेचा फंडात 66  टक्क्यांनी वाढ, रेल्वेसाठी 2.40  लाख कोटींचे बजेट, हे या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे आहेत.  पीएम आवास योजनेसाठीच्या तरतुदीत 66% टक्क्यांनी वाढून 79,000 कोटी एवढी असणार आहे. पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक 33% वाढून 10 लाख कोटी होणार आहे. Budget 2023

नॅशनल एप्रेंटिस स्किम सुरु करणार

47 लाख तरुणांना 3 वर्षांत ट्रेन करण्यासाठी नॅशनल एपेंट्रिस स्कीम सुरु करण्यात येणार आहे. PM कौशल विकास योजना 4.0 अंतर्गत पुढच्या ३ वर्षांत तरुणांना ट्रेनिंग देणार, Coding, AI, 3D printing सारखे नवीन कोर्सेस सुरू होतील. 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. Budget 2023

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

केंद्र सरकारने २००४ मध्ये निवृत्तीनंतर उत्पन्नाचा स्थिर आणि सुरक्षित स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक मासिक उत्पन्न योजना सुरु केली होती. ही एक अतिशय लोकप्रिय आणि सध्याच्या सर्वात किफायतशीर बचत योजनांपैकी एक आहे. ज्येष्ठ नागरिक मासिक उत्पन्न योजनेवर सरकार ७.६० टक्के व्याज देते. यामध्ये, गुंतवणुकीवर आयकर कलम ८०सी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना कर सवलतीचा लाभ देखील मिळतो.

आजच्या अर्थसंकल्पात या योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा ४.५० लाखावरुन ९ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक पती-पत्नी दोघांच्याही संयुक्त खात्यात किंवा नावाच्या गुंतवणुकीसाठीची मर्यादा १५ लाख रुपयांवरून ३० लाख रुपये करण्यात आली, जी यापूर्वी ज्येष्ठ नागरिक पती-पत्नी दोघांच्याही संयुक्त खात्यात किंवा नावाच्या गुंतवणुकीसाठी गुंतवणुकीची मर्यादा १५ लाख रुपये होती. Budget 2023

महिलांसाठी योजना

महिलांसाठी आझादी का अमृत महोत्सव महिला सन्मान बचत पत्र ही नवीन अल्पबचत योजना सुरू करणार आहे. एक वेळची छोटी बचत योजना दोन वर्षाच्या कालावधीसाठी मार्च २०२५ पर्यंत उपलब्ध असेल. या योजनेत गुंतवणूकदारांना ७.५ टक्के व्याज दरासह दोन वर्षांच्या कालावधीसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची ठेव सुविधा दिली जाईल. यातून तुम्हाला आंशिक पैसे काढण्याची परवानगी असेल. Budget 2023

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

आयकरात सूट

सर्वसामान्य जनतेचे लक्ष आयकरच्या मर्यादेकडे असते. नव्या अर्थसंकल्पात ३ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. तर  आयकर सूट मर्यादा आता ७ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यावर्षीपासून  नवीन कर प्रणाली लागू होणार आहे. यामध्ये वैयक्तिक आयकरात ५ स्लॅब तयार करण्यात आले आहेत.  ५ स्लॅबमध्ये ३ लाखांपर्यंत कोणताही कर नसेल. तसेच ३ ते ६ लाखांपर्यंत ५ टक्के, ६ ते ९ लाखांपर्यंत १० टक्के, ९ ते १२ लाखांपर्यंत १५ टक्के, १२ ते १५ लाखांपर्यंत २० टक्के आणि १५ लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर असेल. Budget 2023

बजेट २०२३ : काय स्वस्त

सायकल, मोबाईल फोन, टि.व्ही.चे सुटे भाग, हिऱ्याचे दागिने, इलेक्ट्रीक वाहने, आयात खेळणी.

या अर्थसंकल्पात मोबाईल मध्ये वापरल्या जाणाऱ्या कॅमेरा लेन्स आणि लीथियम आयन बॅटरी यावरील सीमा शुल्क कमी केले आहे.   टेलीव्हिजन सेटमध्ये वापरण्यात येणारी काही भागांवरील सीमा शुल्क रद्द करण्यात आले आहे. प्रयोगशाळेत बनवण्यात येणाऱ्या हिऱ्यांच्या बीजावर असलेली सीमा शुल्क कमी करण्यात आले आहे. डिनेचर्ड इथाईल अल्कोहोल सीमा शुल्क मधून हटवण्यात आले आहे. क्रूड ग्लिसरिनवर लावण्यात आलेले सीमा शुल्क 7.5 वरून 2.5 वर आणले आहे. Budget 2023

बजेट २०२३ : काय महाग?

यंदाच्या सिगारेट, इमिटेशन ज्वेलरी, सोने, चांदी, प्लॅटिनियम, इलेक्ट्रिक किचन चिमणी या वस्तू महागणार आहेत. (Budget 2023)

Tags: Budget 2023Finance MinisterGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsModi governmentNews in GuhagarNirmala SitaramanUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share270SendTweet169
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.