• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 March 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर कुटगिरी ग्रामस्थांच्या मागणीला यश

by Mayuresh Patnakar
March 29, 2023
in Guhagar
109 1
0
BSNL 4-G Tower at Kutgiri
214
SHARES
611
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हा परिषद रत्नागिरी कडून बीएसएनएल 4-जी टॉवर उभारण्याचे आश्वासन

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील मौजे कुटगिरी येथे बी एस एन एल चा टॉवर होण्यासाठी येथील ग्रामस्थांनी वारंवार, शासन, प्रशासन स्तरावर प्रयत्न केले. ग्रामस्थांनी आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. त्यानंतर ग्रामस्थांच्या या मागणीला यश आले असून जिल्हा परिषद रत्नागिरी कडून बी एस एन एल रत्नागिरी विभागाकडून टॉवर उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. BSNL 4-G Tower at Kutgiri

जिल्हा परिषद रत्नागिरी कडून बी एस एन एल रत्नागिरी विभागाला मौजे कुटगिरी येथील जिल्हा परिषद आरोग्य उपकेंद्रजवळ नवीन बीएसएनएल 4G टॉवर उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. नवीन टॉवरमुळे मौजे कुटगिरीमधील वर्षानुवर्षांचा मोबाईल रेंजचा त्रास कायमचा मिटणार आहे. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. BSNL 4-G Tower at Kutgiri

याबाबत स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान, ग्रामपंचायत कुटगिरी – पाती यांनी जिल्हा परिषद रत्नागिरी, बी एस एन एल रत्नागिरी यांचे जाहीर आभार मानले. BSNL 4-G Tower at Kutgiri

Tags: BSNL 4-G Tower at KutgiriGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share86SendTweet54
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.