गुहागर, ता. 09 : एलिझाबेथ ही ब्रिटनची सर्वात जास्त काळ सत्ता सांभाळणारी सम्राज्ञी होती. एलिझाबेथ यांचे बालमोरल येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्या सत्तर वर्षे ब्रिटनच्या सम्राज्ञी होत्या. राणी एलिझाबेथ यांच्या निधनाने लंडनमध्ये शोककळा पसरली आहे. Britain Queen Elizabeth No More

एलिझाबेथ स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या चिंताजनक प्रकृतीमुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य बालमोरल कॅसलमध्ये अगोदरच दाखल झाले होते. ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनीदेखील राणी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. बकिंघम पॅलेसच्या या बातमीने संपूर्ण देश चिंतेत आहे. युनायटेड किंगडममधील लोकं राणी आणि तिच्या कुटुंबासोबत असल्याचे त्यांनी ट्विट केले होते. Britain Queen Elizabeth No More

राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलिप यांचे 9 एप्रिल 2021 रोजी निधन झाले. राणीला चार मुले आहेत. प्रिन्स चार्ल्स, राजकुमारी ऍनी, अँड्र्यू आणि एडवर्ड, ज्यांच्यापासून त्यांना आठ नातवंडे आणि 12 पणतू आहेत. Britain Queen Elizabeth No More
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/8zoWNzf49sb
