मुंबईचा नवरा हवा हे फॅड कायम; गावचा मुलगा अधिक कमावता असूनही नकोसा
रत्नागिरी, ता. 15 : मुंबईचा नवरा हवा हे फॅड आजही कोकणात कायम आहे. मुंबईपेक्षा गावात राहणारा मुलगा चांगले पैसे कमवितो आणि चांगला संसार करतो, हेही आता स्पष्ट झाले आहे. असे असतानाही गावात राहणाऱ्या ३० टक्के तरुणांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत. समोर लग्नाचे मुहूर्त असताना आणि लग्नाचे वय उलटून जात असताना लग्नासाठी मुलगी कुठून आणायची, हा गंभीर प्रश्न अशा मुलांच्या मातापित्यांसमोर आज उभा राहिला आहे. Boys in Konkan do not get girls for marriage
सरकारी नोकरी असली, तर मुलाचे लग्न लवकर जमते. बऱ्याचवेळा सरकारी नोकरीत असणारीच मुलगी मिळते. तलाठी मुलगा असेल, तर शिक्षिका किंवा ग्रामसेविका किंवा सरकारी कार्यालयातील लिपिक असणारी मुलगी लग्नासाठी तयार असते. परंतु, सरकारी नोकरी नसली तर मात्र सरकारी नोकरीत असणारी मुलगी अशा मुलांसोबत लग्नासाठी तयार नसते. कोकणात एक काळ असा होता की लग्रासाठी मुली कमी नसायच्या. मुलगा- मुलगी बघायला आला की, अनेक प्रश्न विचारून मुलींच्या वडिलांना भंडावून सोडायचे. किंबहुना मुलीची बाजू कमकुवतच असायची. उलट या परिस्थितीमुळे आता मुलीचा पिताच मुलाच्या पित्यासमोर अनेक मागण्या ठेवू लागला आहे. कोकणात तुळशीचा विवाह झाला की, लग्नं सुरू होतात. अलीकडे पावसाळ्यातही लग्नं होतात. दरवर्षी मे महिन्यात जास्त लग्नं होतात. Boys in Konkan do not get girls for marriage
सध्या मुली कमी असल्याने व योग्य मुलगी मिळत नसल्याने मुलींचा अपेक्षांचा डोंगर वाढताच आहे. मुलगा मुंबईला राहतो का? तिथे त्याची स्वतःची खोली आहे का ? कोणत्या भागात खोली आहे? मुलाला चांगली नोकरी आहे का? पॅकेज किती आहे ? मुलगा एकुलता एकच असावा. नणंदेचे लग्न झालेले असावे, असे अनेक टुणमे काढले जातात. कोकणातील मुलींना मुंबईचे खूपच आकर्षण आहे. गावी राहून शेतीत काम करण्यापेक्षा मुंबईला जाऊन तेथील झगमगाट, आसपास मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि मनोरंजनाची साधने याची भुरळ मुलींना पडते. त्यांना इथल्या जीवनापेक्षा मुंबईतील गजबजाट आकर्षित करतो. Boys in Konkan do not get girls for marriage
मुंबईचा नवरा करायचा आणि दहा बाय दहाच्या खोलीत संसार थाटण्याचे स्वप्न अनेक मुली पाहतात, म्हणून त्यांना मुंबईचा नवरा हवा असतो. मात्र यामुळे गावात राहून धंदा व्यवसाय करणारा, शेती पुरक व्यवसाय करणारा, भाजीपाला पिकवून चार पैसे गाठीशी असणारा, चार चाकी गाडी असणारा मुलगा नाकारतात याचे आश्चर्य वाटते व अशा मुलींची किव करावीशी वाटते असे काही विवाह जुळविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. Boys in Konkan do not get girls for marriage