मुंबई, ता. 23 : श्री किशन चित्याला निर्मित, श्री गांवदेवी उत्सव समिती व झुंजार प्रोडक्शन आयोजित, “आम्ही कोकणकर” प्रस्तुत दोन अंकी मराठी नाटक मुंबई मायानगरी येथे मोठ्या रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. शनिवार दिनांक २६ ऑक्टोंबर २०२४ रोजी ठिक सायंकाळी ७ वाजुन ४५ मिनीटांनी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह (दादर) या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी कृष्णा येद्रे ९७७३१४२८१९, आनंद सनगरे ८६५२१४१५६१, रमेश शिरगांवकर ९६५३६३२१६८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “Boy of Konkan” play at Shivaji Temple Theatre
आपण एक स्वप्न बघतो आणि मनाशी जिद्द बाळगतो, की हे पाहिलेलं स्वप्न काहीही झालं तरी पुर्ण करायचं म्हणजे करायचं मग त्यासाठी हिंमत आपण ठेवतो आणि ते स्वप्न साकार करतो. असंच एक स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी सज्ज झालं आहे. श्री किशन चित्याला निर्मित, श्री गांवदेवी उत्सव समिती व झुंजार प्रोडक्शन आयोजित, “आम्ही कोकणकर” प्रस्तुत दोन अंकी मराठी नाटक मुंबई मायानगरी मोठ्या रंगमंचावर आपल्या अंगी असलेली कला गुणांना एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी घेऊन येत आहेत. एक नवं कोर मराठी नाटक “कोकणचा पोरं” या नाटकाचे लेखक/ दिग्दर्शक श्री कृष्णा नंदा शांताराम येद्रे यांच्या वास्तव्यदर्शी लिखाणातुन आणि त्यांच्या दुरदृष्टी मधुन आणि त्यांचे सहकारी ह्यांनी मिळुन ह्या नवीन कलाकृतीचा दर्शन घडणार आहेतच, त्याचबरोबर विविध क्षेत्रात नावावंत कलाकार ह्या नाटकात भुमिका करणार आहेत. “Boy of Konkan” play at Shivaji Temple Theatre
कोकणच्या वैभवशाली लाल मातीतील कोकणी माणसाच्या जीवन प्रवासाची कहाणी ! प्रत्येक कोकणी माणसाच्या जीवनाशी निगडीत आहे. एका बापाची व्यथा आहे. आईची ममता आहे, बहिणीची माया आहे. ज्यात कोकणी पोराचं आयुष्यभराचा प्रवास आहे, आपली संस्कृती आहे. जी या नाटकाच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. “Boy of Konkan” play at Shivaji Temple Theatre