गुहागर ता. 15 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संभाजीनगर शहरात खळबळ उडाली. लिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाल्याने १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. लिफ्टच्या गेटमुळे मुलाचा गळा अडकल्याने तो कापला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना इतकी भीषण होती की गेटमध्ये मुलाचा अर्ध्याहून अधिक गळा कापला गेला होता. Boy dies after getting stuck in lift door
साकीब सिद्दिकी इरफान सिद्दिकी (वय 13)असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. साकीबच्या वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त साकीबचे आई-वडील हैदराबादला गेले होते. त्यामुळे साकीब कटकट गेट भागातील हयात हॉस्पिटलजवळील इमारतीत राहणाऱ्या त्याच्या आजी-आजोबांकडे राहायला आला होता. रविवारी रात्री तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना साकीब लिफ्टमध्ये गेला. साकीब खेळत असतानाच लिफ्ट सुरु झाली. पण दरवाजा बंद होताना साकीब दरवाजातून बाहेर पाहत होता. लिफ्ट सुरु असल्याने त्याचा गळा दरवाजातच अडकला गेला. Boy dies after getting stuck in lift door

साकीब लिफ्टमध्ये अडकल्यानंतर जोरदार आवाज झाला आणि त्याचा गळा कापला गेला. गळा कापताच सगळीकडे रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. इमारतीमध्ये लोकांना हे कळताच त्यांनी लिफ्टकडे धाव घेतली आणि लिफ्ट थांबवली. मात्र तोपर्यंत साकीबचा मृत्यू झालेला होता. साकीब राहत असलेली इमारत जुनी असल्याने तिथे लिफ्टला सेन्सर नाही. त्यामुळे लिफ्टमध्ये जुन्या पद्धतीचा दरवाजा आहे. लिफ्ट सुरु झाल्यानंतर साकीबने बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा गळा कापला गेला. दरम्यान, या घटनेनंतर जवळच असलेल्या जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारी यांनी आपल्या पथकासह धाव घेतली. पोलिसांनी साकीबच्या मृतदेह पंचनामा केल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. साकीबच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. Boy dies after getting stuck in lift door
