गुहागर मोडकाघर येथील घटना
गुहागर, ता. 10 : पाईप चोरल्याचा जाब विचारल्याचा राग धरून वेल्डींग वर्कसच्या दोन कामगारांना लाथा बुक्याने मारहाण करत चाकुने वार केल्याची घटना गुहागर तालुक्यातील मोडकाघर येथे घडली. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. Both were stabbed with a knife for asking for a jab
गुहागर तालुक्यातील मोडकाघर येथील वसुंधरा एंटरप्रायझेसमध्ये कामाला असलेले प्रज्ञेश संदिप भोसले (वय २६) राहणार आरे, क्षितिज नंदकुमार गुढेकर (वय २४) राहणार साखरी आगर भंडारवाडा, असे चाकुच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या फिर्याददारांचे नाव आहे. या दोघांनीही गुहागर पोलिस ठाण्यात वरवेली येथील प्रकाश अवेरे व त्यांच्या तीघां मुलांविरोधा तक्रार दाखल केली आहे. Both were stabbed with a knife for asking for a jab

८ सप्टेंबर रोजी वसुंधरा एंटरप्रायझेसमधील दोन पाईप चोरीला गेले होते. सदर चोरी किरण अवेरे व त्यांचा मोठा भाऊ चोरून नेत असताना वेल्डींग वर्कशॉपचे मालक मयुरेश बावधनकर यांच्या पत्नीने पाहीले होते. सदर पाईप जंगलामध्ये मिळून आले. दरम्यान मयुरेश बावधनकर याने सदर पाईप चोरीप्रकरणी किरण अवेरे यांच्याजवळ विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आम्ही पाईप चोरले नसल्याचे सांगितले. बऱ्याचवेळ मोबाईलद्वारे सभांषण होऊन हा विषय तीथेच संपला व वेल्डींग वर्कशॉपचे मालक मयुरेश बावधनकर तेथून इतर कामासाठी निघून गेले. परंतु त्यानंतर १५ मिनिटांनी आरोपी प्रकाश अवेरे, किरण अवेरे व त्याचे दोन भाऊ असे चारजण वेल्डीग वर्कशॉपजवळ येऊन क्षितिज गुढेकर याला बोलावून घेत त्याचे हात धरून पाठीमागून लाथाबुक्क्याने मारहाण करत चाकुने खांदयावर वार केले. Both were stabbed with a knife for asking for a jab

त्याला सोडविण्यासाठी प्रज्ञेश संदिप भोसले आला असता त्यालाही लाथा बुक्क्याने मारहाण करत त्याचा अंगावर चाकूने वार केला आहे. अवेरे यांची पुर्वीची पार्श्वभूमि लक्षात घेता. वर्कशॉपमधील इतर कामगार मध्ये पडले नाहीत. मात्र लाथाबुक्क्याने मारहाण व चाकुचे झालेल्या वारामुळे गंभीर दुखापत झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यानंतर गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. Both were stabbed with a knife for asking for a jab
दरम्यान, काहींनी अवेरे यांच्या घरापर्यंत जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी अवेरे कुटुंबातील चार जणांनी तलवारी, सुरे, लोखंडी सळया बाहेर काढुन आलेल्या सर्वांना धमकावले. पोलिस ठाण्यात झालेली उपस्थितीत यामुळे अखेर गुहागर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. प्रकाश अवेरे, किरण अवेरे व त्याचे दोन भाऊ यांच्यावर ३२४, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना घरातून ताब्यात घेतले आहे. Both were stabbed with a knife for asking for a jab
