• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्रद्धांजली चषक स्पर्धेत दत्तकृपा बोऱ्या संघ विजयी

by Manoj Bavdhankar
January 17, 2024
in Guhagar
117 1
4
Borya team won in the Tribute Cup competition
229
SHARES
655
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कन्हैया स्टार क्रीडा मंडळ आयोजित; श्री स्वामी समर्थ आबलोली संघ उपविजेता 

गुहागर, ता. 17 : कन्हैया स्टार क्रीडा मंडळ हे राजकारण विरहित मंडळ असून ते समाजाचा एकोपा जपणारा मंडळ असल्याचे मत गुहागर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी व्यक्त केले. कन्हैया स्टार क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरीत दत्तकृपा बोऱ्या व श्री स्वामी समर्थ आबलोली संघामध्ये झाली. Borya team won in the Tribute Cup competition

Borya team won in the Tribute Cup competition

अंतिम फेरीत दत्तकृपा संघाने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकात 55 धावा पटकावल्या परंतु श्री स्वामी समर्थ संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना सहा षटकात अवघ्या 44 धावाच करता आल्या. बोऱ्या संघाने 11 धावांनी विजय मिळवत कन्हैया स्टार क्रीडा मंडळ आयोजित कै.नरेश (नाऱ्या भाऊ) व कै. नरेंद्र (नरू दादा)वराडकर श्रद्धांजली चषक 2024 क्रिकेट स्पर्धेतील अजिंक्यपद पटकावले. विजेत्या दत्तकृपा बोऱ्या संघास 25 हजार रुपये व चषक, उपविजेत्या श्री स्वामी समर्थ संघाला 15000 रुपये व चषक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. तर वैयक्तिक मध्ये उगवता तारा म्हणून राज नागवेकर व अद्वैत पडवळ या दोघांची निवड करून त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तर उत्कृष्ट फलंदाज अविनाश पटेकर याला चषक व बॅट, उत्कृष्ट गोलंदाज विनायक पाटील चषक व शूज, क्षेत्ररक्षक सुयश पाटील चषक व गॉगल देण्यात आले. मालिकावीर अमित पवार याला चषक, बॅट, कॅप, ट्रॅक सूट, शूज देण्यात आले. तर अंतिम सामन्यातील सामनावीर दीप मोरे याला चषक व स्मार्ट वॉच देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. Borya team won in the Tribute Cup competition

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष (अजित पवार गट) सुरेश सावंत, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी व निर्मल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संतोष  जैतापकर, लोकनेते सदानंद आरेकर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष साहिल आरेकर, मुन्ना देसाई, ज्येष्ठ कार्यकर्ते पद्माकर आरेकर, दीपक  शिरधनकर, नेहा वराडकर, दिलीप गोयथळे, भरत गोयथळे, हेमचंद्र आरेकर, अशोक गोयथळे उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचक म्हणून सिद्धेश आरेकर व श्रीरंग वराडकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कन्हैया स्टार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मनीष गोयथळे व मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. Borya team won in the Tribute Cup competition

Tags: Borya team won in the Tribute Cup competitionGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTribute CupUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share92SendTweet57
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.