• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दामले विद्यालयात ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदिंडी

by Guhagar News
January 29, 2025
in Ratnagiri
92 1
0
Book exhibition at Damle School
180
SHARES
514
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विद्यार्थ्याला मराठीतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते; उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

रत्नागिरी, ता. 29 : विद्यार्थ्याला मराठी भाषेतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी येथील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयात ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदिंडीचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. Book exhibition at Damle School

Book exhibition at Damle School

यानिमित्त आयोजित व्यासपीठावर मराठी भाषा समिती सदस्य आणि कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एन. कासार, कोमसापचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, कोमसाप केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, अरुण मोरये, दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान मोटे आदी उपस्थित होते. Book exhibition at Damle School

Book exhibition at Damle School

यावेळी रत्नागिरी नगर शिक्षण मंडळातर्फे सुमारे एक हजार पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन श्रीमती साठे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दामले विद्यालयातर्फे ग्रंथदिंडीचे मारुती मंदिर परिसरात आयोजन करण्यात आले.  आपले शिक्षण मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून, आता आपण उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे मराठी शिक्षण आपल्याला समृद्ध करते. याच मराठी भाषेतील शिक्षणाने उच्च पदापर्यंत पोहोचवले, असे मत उपजिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी व्यक्त केले. दामले विद्यालयासारखी मराठी माध्यमाची शाळा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण क्षेत्रात चौफेर आपला ठसा उमटवते, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. Book exhibition at Damle School

Book exhibition at Damle School

श्री. पाटील यांनी मराठी भाषेचा अभिजात भाषेपर्यंतचा प्रवास मुलांसमोर सोप्या भाषेत उलगडला. विद्यार्थ्यांनी रोज वाचण्याची सवय लावण्याची गरज असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. कासार म्हणाले. यावेळी उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक श्री. मोटे    यांनी मानले. Book exhibition at Damle School

Tags: Book exhibition at Damle SchoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.