मुंबई, ता. 20 : चिकन बिर्याणी खाणे कुर्ल्यात राहणार्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. कारण घशात अडकलेले चिकनचे हाड काढण्यासाठी त्याच्या मानेवर डॉक्टरांना तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. कुर्ल्यातील ३० वर्षीय तरुण घशात सूज आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात भरती झाला होता. Bone stuck in throat


नाक, कान, घसा विकारतज्ज्ञ डॉ. संजय हेलाळे यांनी एक्स-रे, सिटी स्कॅन आणि दुर्बीण तपासणीनंतर त्याच्या नाकाच्या मागील भागात हाड आढळून आले. हाड टोकदार असल्याने अन्ननलिकेची दोन्ही टोके खराब झाली होती. तसेच आतमध्ये संसर्ग झाला होता. संसर्ग दूर करण्यासाठी तीन दिवस इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्याच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र मानेचा आणि पोटाचा एक्स-रे घेतल्यानंतर कुठेही हाड दिसले नाही. ऑपरेशन दरम्यानच बेशुद्ध अवस्थेत रुग्णाचे सिटी स्कॅन करण्यात आले. सिटी स्कॅनमध्ये नाकाच्या मागच्या बाजूला हाड दिसून आले. एन्डोस्कोपीच्या मदतीने नाकातून हाड काढण्यात आले. Bone stuck in throat