मुंबई, ता. 27 : मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाचं प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी वेळापत्रक जाहीर झालं आहे. ही प्रक्रिया २७ मे २०२२ पासून सुरू करण्यात येणार असून या नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर केलं आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. Bombay University has released the schedule for FY admission

अर्ज विक्री – २७ मे ते १२ जून, २०२३ (दुपारी १ वाजेपर्यंत)
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – २७ मे ते १२ जून, २०२३ (दुपारी १ वाजेपर्यंत)
एडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख – २७ मे ते १२ जून, २०२३ (१.०० वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.
पहिली मेरीट लिस्ट – १९ जून, २०२३ ( सकाळी ११.०० वाजता)
ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – २० जून ते २७ जून, २०२३ (दुपारी.३.०० वाजे पर्यंत )
द्वीतीय मेरीट लिस्ट – २८ जून, २०२३ ( सायं. ७.०० वा.)
ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – ३० जून ते ०५ जुलै, २०२३ ( दुपारी.३.०० वाजे पर्यंत)
तृतीय मेरीट लिस्ट – ०६ जुलै, २०२३ ( सकाळी. ११.०० वा.)
ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – ०७ जुलै ते १० जुलै, २०२३
पदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतूदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होतील. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. Bombay University has released the schedule for FY admission

