• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वरमध्ये आढळली बॉम्ब सदृश स्फोटके

by Ganesh Dhanawade
July 3, 2022
in Guhagar
21 0
0
Bomb-like explosives in Velneshwar
41
SHARES
117
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बॉम्ब शोधक पथकाने केली स्फोटके निकामी; ठाकूर यांच्या सतर्कतेचे कौतुक

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी रविवारी सकाळी बॉम्ब सदृश स्फोटके आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, आढळून आलेली स्फोटके बॉम्ब शोधक पथकाने निकामी केली आहेत. जर काही स्फोटके मुलांच्या हाती लागली असती तर या बॉम्ब सदृश स्फोटकांचा स्फोट होऊन दुर्घटना घडली असती अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. Bomb-like explosives in Velneshwar

Bomb-like explosives in Velneshwar

वेळणेश्वर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नवनीत ठाकूर हे नेहमीप्रमाणे आपल्या घराशेजारील समुद्रकिनारी चालण्यासाठी गेले होते. चालत असताना त्यांना समुद्रात लाटेवर मोठी प्लास्टिक बरणी तरंगत येताना दिसली. श्री. ठाकूर यांनी पाण्यात जाऊन प्लास्टिक बरणी पाण्यातून बाहेर काढली. आत पाहिले असता, त्यात स्फोटकांसारख्या वस्तू दिसून आल्याने त्यांनी पत्नी व जिल्हा परिषदेच्या सदस्या नेत्रा ठाकूर यांना सदरील प्रकार सांगितला. ठाकूर यांनी गुहागर पोलीस स्टेशनला संपर्क साधून ही घटना सांगितली. पोलिस निरीक्षक बी. के. जाधव यांनी उपनिरीक्षक श्री. कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल वायगंणकर, वैभव चौगुले, कुमार घोसाळकर, आशिष फुटक यांना घेऊन सकाळी ८ वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या बॉम्ब सदृश वस्तूची पाहणी करून लगेचच वरिष्ठांना त्याची माहिती दिली. वरिष्ठांनी तात्काळ याची दखल घेत रत्नागिरीतून बॉम्ब शोधक प्रमुख प्रितेश शिंदे आणि सहकारी व श्वान राणा व पथक पाठविण्यात आले. काही वेळात हे पथक दाखल होऊन या बॉम्ब सदृश स्फोटकांची तपासणी करून ही स्फोटके निकामी करण्यासाठी नवनीत ठाकूर यांच्या मोकळ्या जागेमध्ये नेऊन ती पाचही स्फोटके निकामी करण्यात आली. Bomb-like explosives in Velneshwar

Bomb-like explosives in Velneshwar

दरम्यान, सदरील स्फोटके कशासाठी वापरली जात होती. याबाबत या पथकाकडून सांगण्यात आले की, समुद्रामध्ये मोठ्या जहाजावर ज्या वेळेला एखादे संकट आल्यास त्यावेळेस आपण कोणत्या ठिकाणी आहोत. हे दाखवण्यासाठी हॅन्ड हेल्ड रॉकेट पॅरॅशूटचा वापर उपयोग केला जातो. हे त्यावेळी हवेमध्ये उडवून त्याचा स्फोट घडवून आपण याठिकाणी असल्याचे दर्शवतात. ही धोकादायक स्फोटके मुलांच्या हाती लागली असती तर अपघात घडला असता असे पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोटके निकामी करतेवेळी सरपंच चैतन्य धोपावकर, माजी सरपंच नवनीत ठाकूर, प्रतीक ठाकूर हेही उपस्थित होते.माजी सरपंच नवनीत ठाकूर यांनी किनारी संशयास्पद वस्तू आढळून आल्यानंतर दाखवलेल्या सतर्कतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. Bomb-like explosives in Velneshwar

Tags: Bomb-like explosives in VelneshwarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.