• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाकिस्तान पोलीस स्टेशनमध्ये बॉम्ब हल्ला

by Guhagar News
April 26, 2023
in Bharat
69 1
0
Bomb attack in Pakistan police station
135
SHARES
387
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

१२ पोलीस ठार तर ५० हून अधिक लोक जखमी

रत्नागिरी, ता. 26 : पाकिस्तानच्या स्वातमधील दहशतवादविरोधी विभागाच्या पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी रात्री आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला आहे. या झालेल्या स्फोटात किमान १२ पोलीस ठार झाले. तर ५० हून अधिक लोक जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस ठाण्यात दोन स्फोट होऊन संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली असे पोलिसांनी सांगितले. Bomb attack in Pakistan police station

जगभरात दहशतवादाची निर्यात करणाऱ्या पाकिस्तानलाच आता त्याचा फटका सहन करावा लागत आहे. स्वात जिल्ह्यात सोमवारी रात्री एका पोलीस ठाण्यावर आत्मघातकी हल्ला झाला. या पोलीस ठाण्यात दहशतवादविरोधी विभागाचे कार्यालय आहे. या हल्ल्यात १२ पोलीसांचा मृत्यू झाला, तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हणत शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. Bomb attack in Pakistan police station

पाकिस्तानातील स्वात जिल्ह्याचे डीपीओ स्वात शफीउल्ला यांनी सांगितले, हा स्फोट सीटीडीच्या स्वात जिल्ह्यात कबाल पोलीस ठाण्यात झाला. या स्फोटामुळे तीन इमारती कोसळल्या आणि त्यानंतर भीषण आग लागली. हा आत्मघाती हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या हल्ल्यात एकूण 12 पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. Bomb attack in Pakistan police station

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 8.20 वाजता हा हल्ला झाला. आत्मघातकी हल्लेखोराने पोलीस ठाण्यातच स्वत:ला उडवून घेतले. या पोलीस ठाण्याच्या आवारात सीटीडीचे कार्यालय आणि मशीद बांधली आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण खैबर पख्तूनख्वाह प्रांतात सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या जखमींनी सांगितले की, स्फोटानंतर पोलीस ठाण्याच्या इमारती कोसळल्या. या घटनेत ढिगाऱ्याखाली दबून अनेक लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Bomb attack in Pakistan police station

तिथे सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता पाहता जवळच्या रुग्णालयात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेचे दु:ख व्यक्त करत हल्लेखोरांचा निषेध केला आहे. शरीफ यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानातील जनता शहीदांचे बलिदान कधीही विसरणार नाही. या घटनेत सहभागी असलेल्यांवर कारवाई करून त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली जाईल.  Bomb attack in Pakistan police station

Tags: Bomb attack in Pakistan police stationGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.