गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजन
गुहागर, ता. 05 : मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती अर्थात 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त गुहागर तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने व मॅंगो व्हिलेज गुहागर यांच्या सहकार्याने मँगो व्हिलेज येथे सकाळी 11 ते 2 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Blood Donation Camp on Journalist Day
गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने गेली पाच वर्ष पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाबरोबर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावेळी शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी शहरातील मँगो व्हिलेज येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डेरवण येथील श्री स्वामी समर्थ रक्तपेढी यांच्या वतीने रक्तसंकलनासाठी टीम उपस्थित राहणार आहे. निरोगी आयुष्यासाठी रक्तदान करा. Blood Donation Camp on Journalist Day
रक्तदानाने कोलेस्ट्रोल कमी होते, रक्ताभिसरणाचा वेग वाढतो. रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रणात रहाते. रक्तदानानंतर तीन महिन्यांनी पुन्हा रक्तदान करता येते. यासारखे फायदे रक्तदानातून होतात त्याचबरोबर आपल्या रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचवण्यात मोलाचे योगदान राहते. त्यासाठी शहराबरोबर तालुक्यातील रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदानासाठी सहभागी व्हावे, यासाठी आपण अगोदर नोंदणी करणे अधिक सोयीचे ठरणार आहे. याकरिता गणेश धनावडे 9421187522, मंदार गोयथळे 9421141610 यांच्याकडे संपर्क साधावा. असे आवाहन गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर यांनी केले आहे. Blood Donation Camp on Journalist Day