गुहागर, ता. 01 : पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये (Patpanhale College of Arts, Commerce and Science) जागतिक रक्तदान पंधरवडाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्यावतीने गुरुवार दि. 22/9/22 रोजी ठीक 11 ते 1 या वेळेत या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 26 रक्त दात्यांनी रक्तदान केले. Blood Donation Camp in Patpanhale

यावेळी झालेल्या समारंभास पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण यांच्या हस्ते सिविल हॉस्पिटल रत्नागिरी रक्त पतपेढाच्या डॉ. जयश्री सिस्टर आणि त्यांचे सहकारी यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र रघुनाथ चव्हाण यांनी रक्तदान शिबीरास शुभेच्छा व संदेश पाठविला होता. त्याचे वाचन प्रास्ताविकात करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रा. प्रमोद देसाई यांनी संबंधित विभागांना आणि शिबिरातील स्वयं सेवकांना धन्यवाद दिले. यामध्ये 26 रक्त दात्यांनी रक्तदान केले. Blood Donation Camp in Patpanhale

रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या स्वयंसेवकांनी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी रक्तदान करून सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पारखे यांनी केले तर आभार प्रविण सनये यांनी मानले. Blood Donation Camp in Patpanhale
