• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाजपातर्फे रक्तदान शिबीर

by Guhagar News
September 23, 2024
in Politics
157 2
7
Blood donation camp by BJP
309
SHARES
883
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

गुहागर, ता. 23 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका यांच्यातर्फे शृंगारतळी पालपेणे रोडवरील भवानी सभागृह येथे रक्तदान शिबीराचे आयोजित आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन गुहागर विधानसभा मतदारसंघ संघ निवडणूक प्रमुख, माजी आमदार डॉ विनय नातू यांच्याहस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. रक्त संकलित करण्यासाठी शासकीय रुग्णालय रत्नागिरी मधील टीम आली होती. या रक्तदान शिबीरात विविध स्तरांवर काम करणाऱ्या ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. Blood donation camp by BJP

Blood donation camp by BJP

यावेळी भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल भालेकर, जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, अभय भाटकर, लक्ष्मण शिगवण, महिला आघाडी गुहागर तालुकाध्यक्ष अपूर्वा बारगोडे, माजी सभापती दिप्ती असगोलकर, तालुका सरचिटणीस सचिन ओक, दिनेश बागकर, रविंद्र अवेरे, तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, संदिप साळवी, मंगेश जोशी, नरेश पवार, पंचायत समिती माजी सदस्य विजय भुवड, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, अल्पसंख्याक आघाडी संयोजक आसीफ दळवी, विनायक सुर्वे, समीर घाणेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संगम मोरे, आशिष विचारे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Blood donation camp by BJP

या रक्तदान शिबीराला अनेक वेळा रक्तदान शिबीराचे आयोजन करणारे, सामाजिक युवा कार्यकर्ते उमेश खैर, साप्ताहिक गुहागर टाईम्सचे संपादक, पेवे माजी सरपंच निसारभाई खान, पत्रकार गणेश किर्वे, वडद उपसरपंच संदिप धनावडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबीरामध्ये सहभागी झालेले रक्तदाते तसेच शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतकांना तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी धन्यवाद दिले. Blood donation camp by BJP

Tags: Blood donation camp by BJPGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share124SendTweet77
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.